सातारा/अनिल वीर : १५ ऑगस्ट २०२३ हा स्वातंत्र दिन साजरा केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन सुरू करण्यात आले होते.त्यांच्या मागण्या काही मान्य केल्या असून उर्वरित आश्वासन दिल्याने आठव्या दिवशी आंदोलन स्थगित केले असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी केली.
बोगस कास पठार कार्यकारी समिती आणि सातारा वनक्षेत्रपाल (प्रा).उपवनसंवरक्ष, सहाय्यक वनसंवरक्षक (वनिकरण व कँपा ) सातारा. वनक्षेत्रपाल (प्रा) मेढा, वनपाल बामणोली तसेच सदर बोगस समितीत सचिव म्हणून काम करणारा वन कर्मचारी यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. मराठी मिशन, वायंडर चर्च मिनिस्टीची व जंगम मालमत्ताची विल्लेवाट लावण्यासाठी बोगस डॉक्युमेंटस, बोगस शिक्के तयार करून त्याचा चुकीचा वापर करणाऱ्या लखोबा लोखंडेवर मोका अंतर्गत कारवाई करावी. विद्यार्थ्याचा आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या गुरुकूल, शानबाग, युनिवर्सल स्कूलची मान्यता तात्काळ रद्द करून त्या शिक्षण सम्राटांवर अॅट्रासिटी दाखल करावी. ७० वर्षापासून सातारा जिल्हयात रहिवासी असलेल्या अदिवासी समाजातील लोकाना मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भरतगाव हद्दीतील राजेश मोटर्सचे, अशोक लेलंडचे नैसर्गिक ओढ्यावर बांधलेले अतिक्रमित बांधकाम आणि त्यावर बसविलेला विद्यूत ट्रान्सफार्मर तात्काळ काढून संबंधीतांवर तात्काळ कारवाई करावी. या प्रमुख मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. अदिवासी बांधवाना घरकुलची सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सातारा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी निवासी जिल्हाधिकारी आवटे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्वासमझ दिल्याने आदिवासी बांधव आणि रिपाई पदाधिकार्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.निवासी जिल्हाधिकारीआवटे यांनी संबंधीत विभागाशी फोनवरून संपर्क करून प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी
जिल्हाध्यक्ष संजय (तात्या) गाडे यांच्यासह प.महाराष्ट्र सचिव चंद्रकांत (दादा) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदलनास विविध संघटनांनी पाठींबा दिला होता.यावेळी संघटक दिपकभाऊ कदम, महासचिव सुहास मोरे,युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन (मामा) चव्हाण व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोळ,मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक जामदार व तालुकाध्यक्ष प्रशांत पवार,जिल्हा उपाध्यक्ष अनिष कांबळे,मनोज जगताप,विजय यादव,गणेश बावधने तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल वीर, किशोर धुमाळ,मधुसूदन काळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व महिला मोठया संख्येनी उपस्थित होत्या.