फलटण प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील शरयू शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याला स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून इशारावजा निवेदन घेण्यात आले आहे. त्या निवेदनानुसार निवेदनाची दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडून ऊस बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
यंदा सन 22- 23 चा ऊस गाळप हंगाम शरयू कारखान्याने सुमारे दहा दिवसापूर्वी चालू केला असून प्रति टन उसाचा दर जाहीर केलेला नाही. तसेच सन 21-22 हंगामाचे लेखापरीक्षण करून येऊन गेल्या वेळी हंगामातील अंतिम ऊस दर जाहीर करावा. तसेच चालू वर्षाची एफआर पी ची रकमी जाहीर करून 14 दिवसाच्या आत ऊस बिल देण्याची तरतूद करावी. तसेच चालू वर्षाच्या गाळप बंद होताना ३५० रुपये जाहीर करावे. असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून ऊसबंद आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना आणि कारखान्याचे प्रशासन यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे. या निवेदनावर सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, युवक राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव, तसेच सचिन खानविलकर ,शकील मनेर निखिल नाळे, किसनराव शिंदे, बाळासाहेब शिपकुले, शिवाजी सोडमीसे आदींच्यास्वाक्षऱ्या आहेत.