स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  दि. 17 व 18 नोव्हेंबर रोजी ऊसतोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन

0

फलटण प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी ऊसतोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एका निवेदनाद्वारे दिली आहे.

                        स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या नुसार गेल्या हंगामातील गळत केलेल्या उसासाठी एफ आर पी अधिक200 रुपये अंतिम भाव मिळावा. तसेच राज्य सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत .एक रकमी एफ आर पी देण्यासाठी कायद्या दुरुस्ती करावी आणि 22- 23  च्या  हंगामामध्ये एक रकमी एफ आर पी द्यावी. केंद्र सरकारने 90 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी. साखर निर्यात ओपन जनरल लायसन अंतर्गत जे पहिले निर्यातदार असतील त्यांना द्यावे. केंद्र सरकारने साखरेची किंमत साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करून इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रति लिटर पाच रुपये वाढ करावी. या महत्त्वाच्या मागण्याकडे राज्य सरकार केंद्र सरकार आणि साखर उद्योगाचे लक्ष वेधण्यासाठी हे दोन दिवस ऊस तोड आणि ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारलेले आहे.

                    सर्व शेतकऱ्यांनी स्वेच्छने ऊसतोड बंद ठेवावी  असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कारखान्यांमार्फत ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक करण्यासाठी वाहनधारकांवर कोणताही दबाव टाकून नये असे या निवेदनात म्हटले आहे. फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना त्या निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर धनंजय महामुलकर, नितीन यादव, डॉ. रवींद्र घाडगे प्रमोद गाडे, दादा जाधव, सचिन खानविलकर, शकील मनेर आदि  पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here