संगमनेर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा महाराष्ट्राचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे उपस्थितीत अभिवादन व काव्यसंध्या हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जात असून या निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवी,साहित्यीक यांचे व्याख्याने आयोजित केले जातात. यावर्षी ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक (दि.२५) नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या प्रांगणात यशवंततीर्थ येथे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे.यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेतकरी कवी प्रा. संतोष पवार (श्रीरामपूर) यांचा काव्यसंध्या कार्यक्रम होणार आहे. यावेळी विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात ,लक्ष्मणराव कुटे, बाजीराव पा.खेमनर,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, ॲड. आर.बी सोनवणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमी व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.