पुणतांबा :- दि. ७ ऑक्टोंबर २०२२-
जगामध्ये मी केलं म्हणणा-यांची संख्या प्रचंड आहे, मात्र सहकारातुन स्वतःला घडवून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंनी कर्तव्यातुन कार्यसिध्दीला आपलेसे केले असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील श्रीक्षेत्र वाकडी येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या उपक्रमांतर्गत गोर-गरीब दीन दलित रूग्णांच्या मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यांत आल्या त्या लाभार्थ्यांना चष्म्यांचे शुक्रवारी मोफत वितरण करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मिलींदराव कोल्हे होते. प्रारंभी श्री. शिवाजीराव लहारे यांनी प्रास्तविक केले.
ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जगभर भ्रमण करून मिळवलेल्या ज्ञानातून राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशांत साखर कारखानदारींत अलौकीक कार्य केलेले आहे. त्यांनी तुकाराम गाथेचा अभ्यास करून त्यातुन समाजशिक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन आणि शेतीविषयक ज्ञानाची माहिती घेत स्वतःला सिध्द केले. जगाला पसायदानाच्या संदेशातुन शांतीचा मंत्र देणा-या ज्ञानेश्वर माउलींनी गोरोबा, सेनान्हावी, एकनाथ, नामदेव, सावता, नरहरी, चोखामेळा, तुकारामासह वारकरी सांप्रदाय आदिंना संत पद बहाल केले, अहमदनगर जिल्हयात सहकारातले संत अनंत आहेत त्यात स्व. शंकरराव कोल्हे यांचे नांव उच्च कोटीचे आहे. संत हे कार्याने मोठी होतात, मात्र माणसं संपत्तीने नव्हे तर त्याच्या ज्ञानाने गुणाने आणि समाजकार्याने मोठी होत असतात. स्व. शंकरराव कोल्हेंनी त्यांच्या कार्यातुन अनेकांचा बहुमान वाढविला आहे. काही व्यक्ती समाजात मिसळतात पण त्यांना समाजाचं भलं करता येत नाही, मात्र काही व्यक्ती जनमानसात रमतात आणि समाजाच्या उत्कर्षासाठीही झटतात त्यातले कार्य हे शंकरराव कोल्हे यांचे होते.
याप्रसंगी सर्वश्री. विक्रम वाघ, वसंतराव लभडे, अनिल शेळके, संपतराव चौधरी, धनंजय जाधव, राजेंद्र लहारे, सुनिल कुरकुटे, बापू गोरे, रंगनाथ राशीनकर, संजय शेळके, राजेंद्र लहारे, अतुल लहारे, बाबासाहेब लासुरे, गोरक्षनाथ एलम, नितीन एलम, वसंतराव लभडे, दिलीप लहारे, विष्णुपंत शेळके, अनिल शेळके, बी डी शेळके, ज्ञानदेव शेळके, अनिल पाडांगळे, प्रकाश पाडांगळे, भाउसाहेब लभडे, अशोक शेळके, मिलींद लहारे, ज्ञानदेव भागवत शेळके, किसन शेळके, राहुल गाढवे, ऋषीकेश आहेर, जयप्रकाश शेळके, तात्या गोरे, नितीन साब्दे, शिवाजीराव कोते, जालिंदर लांडे, विनायक लहारे, सुनिल बनकर, वसंत जाधव, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, वाकडी पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी कोपरगाव
श्रीक्षेत्र वाकडी येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या उपक्रमांतर्गत गोर-गरीब दीन दलित रूग्णांच्या मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यांत आल्या त्या लाभार्थ्यांना समाज प्रबोधनकार ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते मोफत चष्म्यांचे वितरण करण्यांत आले, डॉ. मिलींदराव कोल्हे, शिवाजीराव लहारे, धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
(छाया_ जय जनार्दन फोटो, संजीवनी)