सातारा/अनिल वीर : हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने जिल्हास्तरावर आठवीच्या अध्ययनार्थीसाठी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी दिली.
तालुकास्तरावर इ.५ वी ते इ. १० वी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण व शहरी विभागासाठी स्वतंत्रपणे ६ प्रकारच्या स्पर्धा १० केंद्रावर घेतल्या होत्या. त्यापैकी वक्तृत्व स्पर्धेतील ग्रामीण विभागातून ४७ व शहरी विभागातून २९ स्पर्धक जिल्हास्तरासाठी पात्र घोषित करण्यात आले होते.येथील राष्ट्रभाषा भवनात जिल्हा स्तरावर पार पडलेल्या स्पर्धेत ग्रामीण विभागातून ११ तर शहरी विभागातून ९ असे प्रथम ५ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. वक्तृत्व स्पर्धेत ग्रामीण विभागातून कु.सानिका शिर्के (इंग्लिश मिडियम स्कूल मरळी, पाटण) व जुबेर शेख (सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल मसूर) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहरी विभागातून सरगम जाधवराव ( मोना स्कूल, सातारा),प्रज्ञा कुंभार (श्री.पाटील हायस्कूल, करंजे) व जेबा पटवेगार (उर्दू हायस्कूल,कराड) यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला. ग्रामीणसाठी शाहनवाज मुजावर, शिवाजीराव खामकर व संजय काटवटे यांनी तर शहरीसाठी सौ.सुनंदा शिवदास सौ. आशा रसाळ व अविनाश जंगम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.विजेत्यांना दुसऱ्या सत्रात विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती कार्यवाहक अनंत यादव यांनी दिली.