उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड( HPCL) कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीतील कामगारांनी स्वच्छ भारत अभियान सप्ताह अंतर्गत कंपनीच्या हेड ऑफिस ते द्रोणागिरी नोड वसाहत – द्रोणागिरी रेल्वे स्टेशन येथे शनिवारी ( दि १३ ) रँलीचे आयोजन केले होते. यावेळी रँलीत सहभाग घेतलेल्या अधिकारी व कामगारांनी उरण वासियांना स्वच्छतेच महत्व पटवून देत झाडे लावा पर्यावरण वाचविण्याचे आवाहन केले.
हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( HPCL) कंपनीच्या माध्यमातून द्रोणागिरी नोड – रेल्वे स्टेशन परिसर येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात कंपनीचे जनरल मॅनेजर राजेंद्र टिकेकर,चिफ मॅनेजर रोहित सी, कनिष्ठ अभियंता राहुल चव्हाण, मॅनेजर हेमंत कुमार, अधिकारी अमिया सोनु गुप्ता, समिश्रा डोते तसेच कामगार सहभागी झाले होते. स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अभियान आहे. ज्याचा उद्देश रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे आणि कचरा स्वच्छ ठेवणे,झाडे लावणे असा असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कामगारांनी उरण वासियांना पटवून दिले.यावेळी द्रोणागिरी रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक अधिकारी बळराम मिना यांनी अभियानात सहभाग घेतलेल्या हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कामगारांचे आभार मानले आहेत.
आपले आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल घर परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.तसेच पुथ्वी तळावरील समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व संवर्धन करणे गरजेचे आहे.
– हेमंत कुमार,अधिकारी एच पी सी एल प्रकल्प उरण