हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याप्रकरणी अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

0

गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार.

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) :

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे जल जिवन मिशन या योजनेच्या कामाचे बांधकाम साहित्य गेले २ वर्षांपासून ठेवले आहे. सदरचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच सदरचे हुतात्मा स्मारक ही पाणदिवे गावाचे मंदिर, प्रेरणास्थान आहे तरी सदर प्रेरणा स्थानामध्ये बांधकामचे मटेरियल ठेवून सदर प्रेरणास्थानाचे गोडावून मध्ये रूपांतर करण्यात आले व पाणदिवे गावाचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सदर ठेकेदार करित आहे. 

सदर व्यक्तीला वारंवार सुचना देवूनही सदर व्यक्ती साहित्य काढत नाही.हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे. हुतात्मा स्मारकचे विदरूपीकरण झाले आहे.या सर्व कारणामुळे सदर स्मारकाची दुराव्यस्था झाली आहे. हुतात्मा स्मारक हे देशाचे प्रतीक आहेत. देशाचे महत्वाचे ऐतिहासिक ठेवा आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिकांचे ते स्मारक आहेत. अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टी साठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे सदर व्यक्ती विरोधात हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा.संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे २५ सप्टेंबर २०२४ रोजी म्हणजेच हुतात्मा दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोन ग्रामपंचायतचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम,पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील व उरण पोलीस स्टेशन येथे पत्रव्यवहार देखील केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here