ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ तर्फे साई भंडारा उत्साहात संपन्न.

0

उरण दि.21 (विठ्ठल ममताबादे ) दरवर्षी प्रमाणे यंदाही उरण तालुक्यातील ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.रविवार दि 9/10/2022 रोजी श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट नागाव अंबिकावाडी उरण येथून शिर्डीला जाण्यासाठी पदयात्री रवाना झाले व दिनांक 17/10/2022 पदयात्री शिर्डीत दाखल झाले होते. साईबाबांचे दर्शन घेतल्या नंतर उरणला परतल्या नंतर  गुरुवार दिनांक 20/10/2022 रोजी साई मंदिर, अंबिकावाडी उरण येथे श्री सत्यनारायण महापूजा तसेच साई भंडाराचे आयोजन केले करण्यात आले होते. या भंडाराचे भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरणची स्थापना 2000 साली झाली असून उरण ते शिर्डी पदयात्रेचे यंदाचे 22 वे वर्ष होते.सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने या पदयात्रेत सामील होतात.सदर पदयात्रा, सत्यनारायण महापूजा, साई भंडारा व इतर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष संदीप ठाकूर,सेक्रेटरी विजय घरत,हरिभाऊ नाईक, जनार्दन घरत (सल्लागार)यांच्यासह मंडळाचे सर्व संचालक, मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, सर्व साई भक्त, पदयात्री, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here