१९८७ च्या रक्तरंजित लढ्याची पुनरावृत्ती करायला लावू नका : डॉ. श्रुती म्हात्रे 

0

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) : प्रकल्पग्रस्त शेतकरी, बीएमटीसी  मिठागर ,भूमीहीन अश्या अन्याय झालेल्या  कामगार वर्गास  देशोधडीला लावणाऱ्या सिडको प्रशासन  विरोधात ०९ ऑगस्ट २०२४ रोजी अर्थातच क्रांती दिनी कामगार नेत्या डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली  जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कामगारांनी सिडको भवन समोर एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलन केले होते. यावेळी  या आंदोलनात कामगार, शेतकरी, मिठागर असे शेकडो  अन्य प्रकल्प ग्रस्त  तसेच बीएमटीसी कामगार, कर्मचारी  पुनर्वसन समिती सदस्य ,अनेक सामाजिक संघटना पदाधिकारी  व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघर्षाचा जोरदार विरोध पाहता सिडको प्रशासनाने नमती भूमिका घेत आश्वासनाचे पत्र देतकामगार नेत्या डॉ. श्रुती म्हात्रे  यांच्या शिष्टमंडळास व्यवस्थापकीय संचालक जॉईंट  एमडी व  विभागीय अधिकारी यांच्या प्रमुख बैठकीत प्रस्ताव अंती विशेष  हरकती सह प्रधान सचिव व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मंत्रालयात बैठक निश्चित केली असल्याचे अधिकृत  पत्र हि दिले.  प्रशासनाचे पाठपुरावा करणारे अनेक पत्र दाखवत विनंती करत आपण तात्काळ जेष्ठ नागरिकांच्या सोबत आपले  आंदोलन आपण त्वरित मागे घ्या अशी विनंती केली.

पत्रात  माजी बी. एम. टी. सी. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मा. प्रधान सचिव (नवि-१) यांचे अध्यक्षते खाली मंगळवार, दि. १३.८.२०२४ रोजी दुपारी १२.३० वा. त्यांचे मंत्रालयीन दालन, मुख्य इमारत, चौथा मजला, मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती व  सदर बैठकीस संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना उपस्थित रहाणे बाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले आहे.

बैठकीस उपस्थित राहण्याबाबत अध्यक्ष, बस सेवा कर्मचारी पुनर्वसन समिती (बीएमटीसी) यांच्या बैठकी साठी  बी. एम. टी. सी. कर्मचारी पुनर्वसन समिती अध्यक्षा कामगार नेत्या डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांना ०९ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनास मागे घेण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने आग्रह केल्याने बीएमटीसी कामगारांच्या शिष्टमंडळाने सदर लाक्षणीक धरणे आंदोलन तूर्तास काही दिवस हा संघर्ष मागे घेतल्याने प्रशासनाने आभार मानले .या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी  पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील व दि .बा .पाटील २७ गाव  प्रकल्प बाधित कृती समितीचे अध्यक्ष कॉग्रेस तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी ,अजित म्हात्रे ,देविदास थळी, दीपक म्हात्रे, बबन कांबळे व  अन्य कामगार क्षेत्रातील मान्यवर व युनियन चे सहकरी वर्ग  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here