*सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*
*दिनांक:~ 18 ऑगस्ट 2022*
*वार ~ गुरूवार*
*आजचे पंचाग*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*श्रावण. 18 ऑगस्ट*
*तिथी : कृ. सप्तमी (गुरू)*
*नक्षत्र : भरणी,*
*योग :- वृध्दी*
*करण : विष्टी*
*सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 06:58,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*” मनाला ” वाटेल ते करा पण ” मनाला ” लागेल, असं काही करु नका…*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ*
*आईजीच्या जीवावर बाईजी उदार.*
*अर्थ:-*
*दुसऱ्याच्या जीवावर मजा मारणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*दिनविशेष*
*या वर्षातील 230 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.*
*१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.*
*१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.*
*१९५८: बांग्लादेश चे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.*
*१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.*
*१९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.*
*२००५: जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.*
*२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला*
*जन्मदिवस / जयंती*
*१७००: मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)*
*१७३४: रघुनाथराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)*
*१८८६: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)*
*१९००: राजदूत, मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)*
*१९३४: गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा जन्म.*
*१९३६: हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म.*
*१९५६: भारतीय फलंदाज संदीप पाटील यांचा जन्म.*
*१९६७: पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१२२७: मंगोल सम्राट चंगीझ खान यांचे निधन.*
*१९१९: सीग्राम कंपनीचे संस्थापक जोसेफ ई. सीग्राम यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८४१)*
*१९४५: भारतीय क्रांतिकारक, आझााद हिंद सेनाचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)*
*१९७९: भारतीय राजकारणी वसंतराव नाईक यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९१३)*
*२००९: दक्षिण कोरियाचे ८वे राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांचे निधन.*
*२०१२: भारतीय पत्रकार आणि लेखक रा. की. रंगराजन यांचे निधन.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*भारताचा बुद्धिबळ मास्टर खेळाडूचे नाव काय?*
*विश्वनाथ आनंद*
*कजरी (नोटंकी) हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे?*
*उत्तर प्रदेश*
*संत तुकाराम महाराज यांचे नाव काय?*
*तुकाराम बोल्होबा आंबिले*
*महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय?*
*लोणार*
*त्रिवेंद्रम या भारतीय शहराचे सध्याचे नवीन नाव काय आहे?*
*तिरुअनंतपूरम (केरळ)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*बोधकथा*
*यश अपयश*
*व्यवसायात काहीच प्रगती होत नसल्याने बॉस वैतागला होता. ऑफिसमध्ये स्टाफ भरपुर होता पण काम होत नसे.*
*एके दिवशी त्यांनी सगळ्यांना एकत्र बोलावले अन सांगितले की मी तुमच्या सोबत एक खेळ खेळणार आहे, यात जो जिंकेल त्याला फॉरेन टूरला पाठविले जाईल. सर्व स्टाफ खुश झाला अन खेळ काय आहे, हे जाणण्यास उत्सुक झाला.*
*बॉसने सर्वांच्या हातात एक फुगा दिला अन सांगितले की शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, त्यालाच विजयी ठरविले जाईल आणि फॉरेन टूरला पाठविले जाईल.*
*एवढं सांगताच एकच कल्ला झाला. जो तो आपल्या शेजारच्याचा फुगा फोडू लागला. काही आपला फुगा कोणी फोडू नये म्हणून, वाचविण्याचा प्रयत्न करू लागली पण कोणी ना कोणी ते फोडत असत.*
*असे करता करता सर्व फुगे फुटले कोणाच्याच हातात फुगा उरला नाही आणि कुणीच विजेता होऊ शकले नाही.*
*सर्व शांत झाल्यावर बॉसने सांगितले की, शेवटी ज्याच्या हातात फुगा असेल, तोच विजयी ठरेल, असे मी बोललो. याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याचा फुगा फोडावा, असा होत नाही.*
*तुम्ही इतरांचा फुगा फोडला नसता तर , प्रत्येकाच्या हातात आता फुगा असता आणि सर्वच विजयी ठरले असते.*
*तात्पर्य* :-
*यश मिळविण्यासाठी व जिंकण्यासाठी इतरांना हरविणे गरजेचे नाही. इतरांना हरविण्याच्या नादात आपण सर्वच हरवून बसतो.*
*इतरांना जिंकण्यास मदत करा, आपोआप सर्वजण जिंकू शकाल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*आजच्या बातम्या*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*श्री. देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*