११,१२,१३ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन/शैक्षणिक साहित्य दान करण्याचे अनुयायांना आवाहन
येवला ( प्रतिनिधी)
मानव मुक्तीच्या गर्जनेने जगप्रसिद्ध झालेल्या मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र मुक्ती महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक एस डी शेजवळ यांनी दिली आहे .
दिनांक ११,१२,१३ ऑक्टोबर तीन दिवसीय मुक्ती महोत्सव अंतर्गत दिनांक ११ ऑक्टोबर स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम तयारी व आव्हाने या विषयावर येथील नवचेतना करिअर अकॅडमीचे प्रा शुभम निघूट यांचे व्याख्यान आयोजित केली असून दिनांक १२ ऑक्टोबर रोजी भारतीय संविधान संवर्धक व प्रचारक रोहित घोटेकर महाराज यांचे संविधान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह येवला (नाशिक) येथे रोज सायंकाळी ठीक ५ वा. आयोजित करण्यात आले आहे.
दि.१३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येवला येथे बुद्ध-आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा आंबेडकरी शाहिरी जलसा अर्थात मुक्ती पहाट हा कार्यक्रम होणार असून ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांस फुलहार अगरबत्ती उदबत्ती अगरबत्ती यावर निरर्थक खर्च करण्यापेक्षा ग्रामीण भागातील दलित आदिवासी भटक्या विमुक्त व मागास वर्गीय विद्यार्थ्यांना त्याच पैशातून शैक्षणिक साहित्य संकलित करण्यासाठी आवाहन केले जात आहे निरर्थक अनाठाई खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक उपयुक्त अशी शैक्षणिक साहित्य(वही,पेन,कंपास बॉक्स, दप्तर) सदर प्रसंगी दान घेण्यात येणार असून ती गरजू विद्यार्थी आश्रम शाळांना वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुक्ती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान व सर्व रोग निदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वस्तीगृहाचे अधीक्षक बी.डी.खैरनार,लोखंडे,अशोक पगारे,अभिमन्यू शिरसाठ,शरद शेजवळ,सुरेश खळे,राजरत्न वाहूळ,एस एन वाघ,विश्वास जाधव,एम एस सोनवणे यांनी दिली आहे.