सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा जावळी तालुका यांच्यावतीने ९ व्या धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण सहविचार सभा सोमवार दि.१७ रोजी करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सभा मेढा येथे ३ जानेवारी १९४० रोजी झाली होती. त्यासाठी कृष्णा रावजी ससाणे यांनी प्रयत्न केले होते. हाच संदर्भ लक्ष्यात घेऊन दरवर्षी ३ जानेवारी रोजी धम्मपरिषद आयोजित केली जाते. शिवाय,दि.३ जानेवारी २०२२ रोजी प्रथमच समता सैनिक दल निर्माण करण्यात आलेला आहे. त्यासही मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता.तेव्हा दि.३ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या सभेबाबत चर्चा-विनिमय होणार आहे.ऍड.भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या धम्मपरिषदेस केंद्रीय,राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहुन योगदान द्यायचे आहे.तेव्हा त्या नियोजनार्थ बहुउद्देशीय केंद्र पोलीस लाईन, मेढा येथे सकाळी ११ वा. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जावळी तालुकाध्यक्ष तात्या गाडे व सचिव भीमराव परिहार यांनी केले आहे.