अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा –  डॉ.महेश मगर

0

नांदेड – प्रतिनिधी

येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सध्याच्या प्रभारी कुलसचिव पदाचा कारभार मागील नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रभारी व्यक्तीकडे आहे. ते फार्मसी विभागाचे प्राध्यापक असून त्यांना प्रशासनाचा अनुभव शून्य आहे. मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी दखलपात्र एकही काम केलेले नसून जास्तीत जास्त कामे हे लाल फितीत अडकवलेले आहेत. अशा विविध आरोपांसह प्रभारी कुलसचिव यांना पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी निवेदनाव्दारे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.महेश मगर यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठ कायदा 2016 अन्वये परिनियम 14 मुद्दा क्रमांक पाच नुसार कोणत्याही व्यक्तीला प्रभारी पदाचा कारभार हा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करिता उपभोगता येत नाही असे नमूद केलेले आहे. परंतु हे कुलसचिव नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अकार्यक्षमपणे विद्यापीठाचा कारभार हाकलत आहेत.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी घेतलेल्या निर्णयानुसार कारवाई करणे हे सदस्य सचिव म्हणून कुलसचिवांची जबाबदारी असते. परंतु यांनी प्राधिकरणाच्या निर्णयावर कारवाई करण्याचे वारंवार टाळले व ते सिद्ध झाले आहे. चुकीचे उत्तर देणे दिशाभूल करणाऱ्या अधिकारी वर कारवाई न करणे, गैरकारभार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणे अशा पद्धतीचा कारभार हे कुलसचिव करीत आहेत.तसेच इतरही अनेक प्रकरणाची माहिती कुलगुरू दिलेली आहे 

याबाबत कुलगुरू महोदय आपल्याकडे वारंवार तक्रार केलेली असून कोणाच्या दबावाखाली हा अकार्यक्षम  प्रभारी कुलसचिव कामे करत असून हा फक्त सांगकाम्या आणि बाहुली बनलेला आहे. अशा व्यक्तीला प्रशासन पदावरून काढू शकत नाहीत ही खेदाने बाब नमूद करावी वाटते. दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी व त्यांना  तातडीने पद मुक्त करण्यात यावे अशी मागणी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. महेश आनंदराव मगर यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here