दिवाळीच्या अल्पकालीन सुट्ट्या,ऑनलाईन कामाचा भडिमार-अडथळे,निवडणूक कर्तव्य-प्रशिक्षणे यामुळे शिक्षक झाले त्रस्त
नाशिक : महाराष्ट्र राज्यातील पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांचे अपार आयडीसह यु-डायस प्लस प्रणालीमध्ये स्कूल प्रोफाईल, टीचर प्रोफाइल,विद्यार्थी प्रोफाइल अद्यावतीकरणाचे काम ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याबाबत चे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
अशातच दिवाळीच्या सुट्ट्यांसह विधान सभा निवडणूक २०२४ च्या कर्तव्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने पालकांकडून कागदपत्रांची मागणी करण्यासाठी शिक्षकांची धावपळ उडाली असून दरम्यान महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका चा कार्यक्रम निश्चित झाला असून त्या संदर्भातील वेगवेगळे प्रशिक्षणे ऐन दिवाळीच्या सुट्टीत सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाने ऑनलाईन कामाचा भडिमार-अडथळे,निवडणूक कर्तव्य-प्रशिक्षणे हि बाब लक्षात घेऊन ‘अपार’ नोंदणी मुदत डिसेंबर अखेर करण्यात यावी मागणी राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अपार आयडी हा विद्यार्थ्यांच्या प्रोफाइल मधील आधार कार्डशी संलग्न असून आता याला पालकांचे आधार कार्ड जोडले जाणार आहे. ज्यामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघण्यास पालकांना सोयीस्कर होणार आहे हा हेतू उद्देश चांगला असून त्याचे अध्यापकभारती स्वागत करते परंतु सदर कामाच्यासाठी अधिकचा वेळ आवश्यक असून डिसेंबर अखेरपर्यंत सदर कामासाठी शिक्षकांना अवधी द्यावा अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने सर्व व्यवस्थापन व माध्यमातून शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी, ऑटोमेटेड परमनंट,अकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री अद्यावतीकरणाचे काम यु-डायस प्लस मधील स्टुडन्ट मॉडेलच्या प्रोफाईल मध्ये करण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचना दिले आहेत रविवार दिनांक २७ ऑक्टोबर पासून अनेक शाळांना दीपावली सुट्टी लागल्यामुळे यु-डायस प्लस मधील विद्यार्थी प्रोफाइल अंतर्गत जीपी, इपी,एफपी व अन्य काम शिक्षकांना पूर्ण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांकडून काम करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अपार आयडी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांच्या वडील-आई किंवा कायदेशीर सांभाळ करणारे पालक यांचे संमती पत्र विद्यार्थ्यांना शाळेत वाटप केले गेले तर असंख्य ठिकाणी ते काम अपूर्ण स्वरूपात आहे. काही शाळात शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत या संमती पत्रांचे संकलन शाळेमध्ये चालू होते जे मोठ्या प्रमाणावर अपूर्णावस्थेत आहे.
शेवटच्या दिवसात हे काम पूर्ण करताना विद्यार्थ्यांची मोठी धावपळ झाली व काम मार्गी लागलेले नाही. अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांचे आधार कार्ड पॅन कार्ड,वोटर आयडी,ड्रायव्हिंग लायसन्स,पासपोर्ट इत्यादी पाच कागदपत्रांपैकी एक कागदपत्राची आवश्यकता आहे. हे कागदपत्र जमा करण्यासाठी अत्यंत अल्पावधीत शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून जमाजमा करावी लागली ती आज तागायत अपुरी आहे.पालकांचे संमती पत्र भरून घेणे त्यांची कार्यशाळा घेणे यामध्ये मोठी पळापळ झाली आहे दिनांक २७ ऑक्टोबर पासून राज्यातील अनेक शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असून अनेक पालक आणि विद्यार्थी बाहेरगावी असल्यामुळे आशा पालकांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मिळविणे शिक्षकांना अडचणीचे होत आहे.
पालक आपल्या उदरनिर्वाह कामात बाहेर असतात आशा पालकांचा फोन लागत नाही किंवा रोजंदारी फिरस्ती असल्यामुळे आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आशा ऑनलाइन कामाच्या त्रासामुळे शिक्षकांच्या अनेक अडचणी या संदर्भात झाल्या आहेत. शिक्षकांच्या समस्या जाणून ऐन दिवाळीत ऑनलाईन कामाचा धडाका सुरू असून सुट्ट्यांमुळे पालकांशी अपुरा संपर्क होत आहे. अल्पावधीत ना हरकत प्रमाणपत्र भरून घेणे ऐनवेळी पेरेंट्स टीचर मीटिंग घेऊन माहिती सांगणे.बीएलओ शिक्षकांची अपार मुळे दमछाक होते आहे.
निवडणूक प्रशिक्षण आणि अपार कामे एकाच वेळी आल्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने शिक्षकांचे राष्ट्रीय कार्यातील योगदान आणि कर्तव्यदक्षता लक्षात घेऊन अल्पावधीत कागदपत्रांच्या मागणीसाठी होत असलेली धावपळ लक्षात घेऊन अपार नोंदणीच्या संदर्भात डिसेंबर अखेर २०२४ पर्यंत ची मुदत शासनाने द्यावी अशी मागणी राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ समन्वयक एच.जे.सोनवणे, विनोद सोनवणे शिक्षक प्रतिनिधी शैलेंद्र वाघ पालक प्रतिनिधी वनिता सरोदे प्रा.के.एस.केवट,बाबासाहेब गोविंद,एस.एल.वाघेरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.