अभिनेते-दिग्दर्शक प्रमोद पंडीतकलावंत पुरस्काराने सन्मानीत

0

प्रतिनीधी ( अ.नगर ): अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडीत रा पाथरे बु तालुका राहता यांना नाशिक येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये कलावंत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले . कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन,कमल अमुततुल्य, तसेच कमल उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यामाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके,लोककवी वामन दादा कर्डक,कवी वसंत बापट,कवीयञी बहिणाबाईल चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिनानिम्मिताने  सार्वजनिक वाचनालय देवघेव विभाग शालिमार नाशिक येथे कलावंत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी ग्लोबल आडगाव सिनेमा दिग्दर्शक, मा.प्रा.डाॅ.अनील कुमार साळवे,कलावंत पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वागतध्यक्ष सुनील मोंढे ,प्रा.डाॅ.दिपाली सोसे,प्रा.सोमनाथ मुठाळ,सतिश खरात, या प्रमुख अतिथींच्या हास्ते अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडीत यांना कलावंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.बाळासाहेब गिरी,चंद्रिका वैजयंती यांनी केले तसेच राज्यातील लोक कलावंत,नाट्य कलावंत,सिने कलावंत,लोक संगीत,शाहीर,गितकार,कवी,लेखक,गायक,गायिका,अशा विविध क्षेञातील कलावंत उपस्थित होते  या मध्ये प्रमोद पंडीत यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here