चिखली,(प्रतिनिधी)- चिखली तालुक्यातील मेहकरफाटा जवळील लोकुत्तरा महाविहार भालगाव जिल्हा बुलढाणा येथे बुद्ध रूपाचा (बुद्ध मूर्तीचा) प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम महामान भगवान गौतम बुध्द, बोधिसत्व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार श्वेताताई महाले, उपस्थीत भंतेगण यांचे हस्ते करण्यात आले. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी चिखली मतदार संघाच्या लोकप्रिय, विकासमुर्ती आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या निधीतून त्यांनी एक कोटी पंचविस लाख रूपये बुध्दविहार सुशोभिकरण, भंते निवाससाठीचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भालगावच्या प्रथम नागरिक सरपंच मिनाताई संतोष परिहार, उपसरपंच सिमाताई रामदास चव्हाण, भालगावचे ग्रामविकास अधिकारी कांचनताई सर्दड, भाजपा सचिव डॅा.कृषकुमार सपकाळ,गजानन परिहार कॅान्ट्रक्टर, गजानन त्रंबक परिहार सदस्य कृ.उ.बा.समिती, रिपाई आठवले गटाचे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर मराठी संत, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व बुध्द रूपाचा बुध्द मूर्तीचा प्रथम वर्धापन दिन निमित्त धम्म परिषदेचे आयोजन २२, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवार, रविवार दोन दिवस केले होते यामध्ये महापरित्राणपाठ , भिक्खु संघाची धम्मदेसना व संघ दान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खु संघाचे अनुसंघनायक बोधिपालो महाथेरो तसेच अखिल भारतीय भिक्खु संघाचे महासचिव भदंत सुमवंन्नो महाथेरो (चंद्रपूर) यांची प्रमुख धम्मदेसना झाली.
यावेळी धम्म पिठावर लोकुत्तरा चॅरिटेबल मिशनचे संस्थापक अध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो , सुमनवंनो महाथेरो(चंद्रपूर), भदंत काश्यप महाथेरो ,भदंत संघवंस महाथेरो (चंद्रपूर),भदंत मनायु थेरो (डोंगरगाव), भदंत धम्मानंद थेरो, भदंत सारिपुत्त थेरो (गुजरात), भदंत संघपाल (थेरो), भदंत विनयशील,भदंत शीलानंद (अकोला), भदंत धम्मरतन, भदंत अश्वजीत (बोधगया),भदंत बी. राहुलो (आयोजक) आणि भिक्खु संघ उपस्थिती होती.