आजचे विद्यार्थी उद्याचे भारताचे उज्वल भविष्य : डॉ.आशिष खासबागे

0

त्यांनी निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे

बुलडाणा ,(प्रतिनिधी)– बुलढाणा नगरपालीका उर्दू शाळा क्रमांक दोन येथे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रईस काझी सर व शिक्षण विभागाचे बिईओ श्री.मोरे , डॉ. आशिष खासबागे(दंत व मुख रोग विशेषज्ञ), डॉ. रुधिरा जाधव  (स्त्रीरोगतज्ञ-)  डॉ.पंजाब हिरे  (बालरोगतज्ञ), डॉ.पल्लवी जोशी (आहार तज्ञ) , डॉ.आस्था वर्मा (फिजियो थेरेपीस्ट) , डॉ.प्रीती बाहेकर (नेत्र रोगतज्ञ) इत्यादी मान्यवर  उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ.आशिष खासबागे होते.

 या प्रसंगी डॉ.पल्लवी जोशी परिपूर्ण आहाराचे महत्व विशारद केले व विद्यार्थ्यांनी काय खाऊ नये व काय खावे याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.आस्था वर्मा यांनी विद्यार्थी दशेत मैदानी खेळ व व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. डॉ. प्रीती बाहेकर यांनी बाल्य अवस्थेत डोळ्यावरील ताण कसा कमी करायचा व त्याकरता असलेले ट्वेंटी-ट्वेंटी फॉर्मुला विद्यार्थ्यांना समजून सांगितला. डॅा.रुधिरा जाधव यांनी किशोर अवस्थेतील मुलींना व्यक्तिगत आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.. 

आजचे विद्यार्थी उद्या चे उज्वल भारताचे नागरिक आहे नागरिक निरोगी सुदरूढ तर देश सशस्त सुदरूढ राहील देश प्रगती पथावर जाईल त्यासाठी विद्यार्थ्यांत्यांनी निरोगी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपदान स्व.डॅा.अरूण खासबागे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुप्रसिध्द दंतरोग तज्ञ डॉ. आशिष खासबागे यांनी केले व अशा प्रकारची आरोग्याचे शिबिर प्रत्येक तज्ञ डॅाक्टरानी, समाजातील उच्चउभूषीतांनी असा विचार केला पाहीजे की, समाजाचे आपणांस काही देणे घेणे आहे फुल नाही फुलाची पाकळी द्यावी आपणाकडून समाजसेवेसाठी वेळ देतायेईल तेव्हढे देण्याचा प्रयत्न आपआपल्या परिने करावा असी भूमिका मांडली तसेच विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा जेणेकरून स्वास्थ्य सुदृढ राहील.  मौखिक तसेच संपूर्ण आरोग्याची वेळोवेळी तपासणी करण्याचे आवाहन केले

यानंतर डॅा. अरूण खासबागे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्याची तपासणी केली तसेच विद्यार्थ्यांना मोफत टूथ पेस्टचे वाटप केले. ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचार उपचाराची गरज आहे त्यांना योग्य मार्गदर्शन केले 

तसेच डॉ.प्रीती बाहेकर यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली व गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले डॉ.पंजाब हिरे बालरोग तज्ञ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली .या शिबिराचे आयोजन उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रईस काजी सर व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले . राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here