आता अभिमानाने बोलू म मराठीचा अर्थात माझ्या महाराष्ट्राचा – एस.बी.देशमुख

0

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने पाताळेश्वर विद्यालयात जल्लोश

          सिन्नर : मराठी आपली मातृभाषा व बोलीभाषा आहे तिचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आज घोषीत झाला.विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.सविता देशमुख यांनी मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसाचे योगदान यामुळेच प्राप्त झाले भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्वाची आहे व तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल.यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु होते आज त्याला यश मिळाले असे सांगितले. 

 

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधित करतांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी अनेक मराठी भाषक,विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले.त्यांचे आपण मनपूर्वक आभार मानु या आज हा सोन्याचा दिवस पाहण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे योगदान कामी आले. यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे,अभ्यासकांचे हातभार लागले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माय मराठीचा हा बहुमान आपल्याला मिळाला असे सांगितले.

 

याप्रसंगी विद्यालयात साहित्यिक,कवी यांचे विचार निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा,लेखक परिचय स्पर्धा हे उपक्रम घेण्यात आले व या* *निमित्ताने समकालीन प्रकाशन पुणे यांच्याकडून विद्यालयास ५० पुस्तके मिळाली.त्या पुस्तकांचे वितरण विद्यार्थ्यांच्या हस्ते करून आम्ही दररोज एक पुस्तक वाचू  असे आश्वासन विद्यार्थ्यानी मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांना दिले.  बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी, एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी. गांगुर्डे,एस.डी. पाटोळे,आर.एस.ढोली, ए.बी.थोरे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here