*विवाहितेला मिळाला १३ वर्षानंतर न्याय*
महाड प्रतिनिधी: आरती इंगळे या विवाहितेचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी आज माणगाव सत्र न्यायालयाने आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली . महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे भावे पठार गावचे हद्दीत बोरीचा आड नावाचे विहिरी जवळ ०१/११/२०११ ते दि. ०३/११/२०११ चे दरम्यान घडला . सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, सदर गुन्हयातील आरोपी मयत महिलेचा नवरा व आरोपी नातेवाईक हे मयत महिलेचा नेहमी छळ जाच करत असत.या गुन्ह्यातील आरोपी रंजना मनोहर इंगळे हिचे व मयत आरती नरेंद्र इंगळे या दोघींचे दि. ३१/१०/२०११ रोजी रात्री २०.०० चे सुमारास भांडण झाले. त्या भांडणात मयत हिने आरोपी रंजना मनोहर इंगळे हिस लाथ मारून ती बाहेर पडवीत बसली या गोष्टीचा आरोपी नरेंद्र मनोहर इंगळे, आरोपी सुरेंद्र मनोहर इंगळे, आरोपी नरेंद्र मनोहर इंगळे, आरोपी रंजना मनोहर इंगळे आरोपी सुषमा मनोहर इंगळे, आरोपी हरिष तानाजी कदम, आरोपी सुजाता हरिष कदम यांनी मनात राग धरून संगणमत करून मयत आरती इंगळे हिला जिवे ठार मारण्याचा कट रचून आरोपी पतीने मयत सौ. आरती चे दोन्ही हात धरून ठेवले इतर आरोपींनी पाय धरून ठेवले, ते धरून ठेवलेले पाय रूमालाने बांधले व मयतीचे विळयाने नाक कापले तसेच ओढणीने मयत हिचा गळा आवळून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वरील तारखेस वेळी व ठिकाणी मयत हिचे प्रेत भावे पठार गावचे हद्दीतील बोरीचा आड नावाचे विहिरीच्या पाण्यात टाकून देवून तीस जिवे ठार मारले.
सदर घटनेची फिर्याद पोलीसानी घेतली. भा.द.वि.सं. कलम ३०२, २०१,१२० (ब), ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास धन्यकुमार गोडसे, सहा. पोलिस निरीक्षक यांनी केला. सदर खटल्याची सुनावणी मा. अति सत्र न्यायालय, माणगांव रायगड येथे झाली सदर खटल्यामध्ये अति. जिल्हा शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने काम पाहिले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी यु.एल. धुमास्कर, शशिकांत कासार, छाया कोपनर, पोहवा/ ८७९ शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. मा. एन. एस. कोले अति सत्र न्यायाधिश, माणगांव- रायगड यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी नरेंद्र मनोहर इंगळे, मनोहर गोविंद इंगळे व रंजन मनोहर इंगळे यास दोषी ठरवून दि. २१/११/२०२२ रोजी सदर आरोपींन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी रू. ५०००/- दंड न भरल्यास 6 महिण्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.