उरण दि 5 (विठ्ठल ममताबादे) आवरे गावाचे ग्रामदेवता म्हणून आवरे गावातील जरीमाता मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे देखभाल सुरवातीपासून मटकर कुटुंबीय करत आहेत.पूर्वी छोटेसे मंदिर होते. मंदिराला त्यावेळी भिंती नव्हत्या म्हणून तीच परंपरा जपत मंदिराला भिती न बांधता लोखंडी जाळे बसविण्यात आले आहेत.नवसाला पावणारी व गावाचे रक्षण करणारी माता म्हणून या देवीकडे ग्रामस्थ पाहतात. गावातील ग्रामस्थ नवरात्रात या देवीचे दर्शन घेतात व आपल्या कुटुंबांचे रक्षण करण्याचे आईला साकडे घालतात. अत्यंत साधे हे मंदिर असून आवरे गावची ग्रामदेवता म्हणून जरी मरी माता मंदिर प्रसिद्ध आहे. नवरात्रात येथे विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबविले जातात.