उरण आगार कडून विविध योजना विषयी जनजागृती.

0

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत संपुर्ण महाराष्ट्रात शाळेय विदयार्थी/विदयार्थीनीसाठी सवलतीच्या दरात असणा-या विदयार्थी पास सेवा, अहिल्यादेवी होळकर सवलत अंतर्गत मुलींसाठी मोफत पास सेवा तसेच, सवलतीच्या दरात शैक्षणिक सहल, स्काउट गाईड, एन.सी.सी. कॅम्प इत्यादी सेवांचा लाभ घेणेबाबत व सदया रा.प. महामंडळामार्फत विदयार्थी पास वितरण सेवा हि शालांत, महाविदयालय, कॉलेज, या ठिकाणी उपलब्ध होईल व याबाबत नियोजन कळविणे, जनजागृती होण्याकरीता भेट व मार्गदर्शन कार्यक्रम उरण आगार, मुंबई विभाग मार्फत उरण व पनवेल तालुका अंतर्गत आयोजन करीत आहेत. या कार्यक्रमांमध्ये शिक्षक, प्राचार्य, विदयार्थी, पालक यांचे प्रतिसाद मोठया प्रमाणात मिळत आहे.

तसेच विदयार्थीच्या शालेय महाविदयालयीन, व उच्च शिक्षणाकरीता पालक हे अत्यंत महत्व व तत्पर असल्याचे दिसुन येते. तसेच ग्रामिण भागातुन विदयार्थ्यांचा उच्च शिक्षणाकरीता कल हा शहरी ठिकाणी ये जा मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे दिसुन येत आहे.

रा.प. उरण आगार, मुंबई विभाग आगार व्यवस्थापक  अमोल दराडे  व प्रशासकीय कर्मचारी हे, रा.प. महामंडळाची विदयार्थी पासेस सवलत योजना किफायतशीर दरात व इयत्ता बारावी पर्यंतच्या शिक्षण घेणा-या विदयार्थी मुलींसाठी अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना, या सवलती शांलान्त मार्गदर्शन देवुन विदयार्थ्यां मार्फत सर्वसामान्य कुटूंबा पर्यंत पोहचणे प्रसार करणेकरीता प्रबोधन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here