उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण.

0

उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) उरण पूर्व विभागातील जनतेच्या या महत्वाच्या समस्याकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे.लोकशाही, कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने लढा लढून, पत्रव्यवहार करुन सुद्धा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याने उरण पूर्व विभाग मित्र परिवारा तर्फे २४ मे २०२४ पासून दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे सदस्य गोरख ठाकूर यांनी दिली आहे.

उरण तालुक्यातील पूर्व विभागातील खोपटे ते कोप्रोली रस्ता सुसज्ज व्हावा, खोपटे गावात भीषण अपघात होऊन निलेश म्हात्रे या मृत तरुणाला नवी मुंबई परिवहन सेवा (एन एम एम टी )तर्फे त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळावी तसेच ह्या अपघातातील गंभीर जखमी केशव ठाकूर यांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.  पूर्व विभागातील शेत जमिनीतून गेल इंडियाच्या जाणाऱ्या पाई‌पलाईनला शेतक-यांचा विरोध आहे.

या पाईपलाईन मध्ये शेतकऱ्यांना प्रशासनाने विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.जेएनपीटी हायवेवर होत असलेले अपघात आणि बेशिस्त अवजड वाहनांची वाहतूक व अनधिकृत पार्किंग बंद व्हावे. तसेच खोपटा ते कोप्रोली रस्ता एनएचएआय आणि पीडब्लूडी मधील वादामुळे रस्ता झाला नाही तो रस्ता सुसज्ज करावा.या सर्व प्रमुख समस्या सोडवाव्यात. तसेच विविध मागण्यासाठी ‘उरण पूर्व विभाग मित्र परिवार’ या सामाजिक संस्थेतर्फ २४ मे व २५ मे २०२४ रोजी  दोन दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. सदर समस्या विषयी उरण पूर्व विभाग मित्र परिवारातर्फे यापूर्वीही प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. मात्र उरण पूर्व विभागातील जनतेच्या या महत्वाच्या समस्याकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे.लोकशाही, कायदेशीर मार्गाने शांततेच्या मार्गाने लढा लढून, पत्रव्यवहार करुन सुद्धा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याने उरण पूर्व विभाग मित्र परिवारा तर्फे २४ मे २०२४ पासून दोन दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे सदस्य गोरख ठाकूर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here