उलवेतील शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश.

0

उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार.

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे) : राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. उरण विधानसभा मतदार संघातील उलवे येथील शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. उलवे शिवसेना नोड शहर प्रमुख मनोज विष्णु घरत, शाखाप्रमुख विनोद सावंत, महिला शाखा प्रमुख सोनल मनोज घरत,स्नेहल घरत यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईमधील वर्षा निवास स्थानी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात जाहिर पक्षप्रवेश केला. उरण विधानसभा मतदार संघातील उलवे मधील शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहिर पक्ष प्रवेश केल्याने उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात एकच खळबळ माजली. मनोज घरत व इतर पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केल्याने उरण मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.12 वर्षे एकनिष्ट्येने काम करूनही माझ्या सारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला निर्णय प्रक्रियेतून व विविध कार्यक्रमातून नेहमी डावलले जात होते.म्हणून मी नाराज झालो व शेवटी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्ष प्रवेश केला असल्याचे मनोज घरत यांनी सांगितले.पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य रुपेश पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here