प्रतिनिधी हडपसर :
एस. एम. जोशी कॉलेजमधील क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना विभाग व ज्युनिअर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेमा ताकवले योग प्रशिक्षक उपस्थित होत्या. त्यांनी योगाचे महत्त्व सांगितले. तसेच मन, बुद्धी, ध्यानधारणा, प्राणायाम इत्यादींची उपयुक्त माहिती सांगितली. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे योगाची माहिती करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की, आरोग्यासाठी योग उत्कृष्ट व उपयुक्त आहे. भारतीय परंपरेत योगाला महत्त्व असून, या परंपरेचे सर्वांनी दूत व्हावे. असे आवाहन प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय फिजिकल डायरेक्टर प्रा.दत्ता वासावे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेखा कराड यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, डॉ.शिल्पा शितोळे, प्रा.तृप्ती हंबीर, प्रा.किसन पठाडे, प्रा.ऋषिकेश खोडदे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.