सातारा : ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश असतानाही करंजखोप,ता. कोरेगाव येथे कार्यक्रम झालाच नसल्याने कडक कारवाई करावी.अशा आशयाचे निवेदन समस्त बौद्धजन समाज यांनी जिल्हास्तरावर दिले आहे.
मुंबई महाराष्ट्र शासनाचा जी. आर. (आदेश)आहे. प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. ज्या ग्राम पंचायती मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करून पाठवावेत. तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही ? याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्याक्तीने/ पत्रकाराने/ शिक्षकांने/ तलाठी यांनी मोबाईल वरती शूटिंग घेवून http//bhartimaharashtra. gov.in या वेबसाईट वरती गावाचे नाव, तालुका, जिल्हा, सरपंचाचे नाव, ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित संरपच ग्राम सेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.असा आदेश असताना स्वातंत्र्यानंतर संविधानकर्त्यावर अन्याय केला असुन अजून अस्पृश्यता असल्याचे द्योतक आहे.
कार्यक्रमासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता.त्याठिकाणी संबंधित कोण्हीच हजर नव्हते.ग्रामसेवकास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी फोन उचलालच नव्हता. तेव्हा उच्च स्तरांवरून चौकशी करून जास्तीत जास्त शिक्षा करावी. ग्रामसेवकसह,सरपंच,सदस्य व संबंधितावर कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता जातीयवादी कृत्य केल्याने ऍट्रोसिटीच दाखल करून कारवाई करावी.अशा अशायाचे कडक व सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.निवेदनावर अनेक स्वाक्षरी आहेत.