कराडशी ऋणानुबंध : स्व. बाळासाहेब ठाकरे मध्यरात्री 2.30 वाजता शिवाजी स्टेडियमवर

0

विशेष प्रतिनिधी;विशाल पाटील :
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड  शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रात्री अडीच वाजता कराड शहरात आल्याची आठवण, यावेळी त्यांनी सांगितली आहे. शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे अन् त्यांचे सुपुत्र उध्दव ठाकरेंचीच असल्याचे म्हटले आहे
          नितीन काशिद म्हणाले, सन 1983- 84 ला कराड शहरात शिवसेनेची शाखा स्थापन करण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल घेवून त्यांनी शिवसेना शाखा काढण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर शाखेचे काम कसे असावे, हेही त्यांनी ते विषद केले. अत्यंत आपुलकीचे पत्र आजही मी जपून ठेवले आहे. त्यानंतर 1989 साली कराड शहरात यशवंतराव मोहिते यांच्या पुढाकारातून चाैफेर प्रतिष्ठानतर्फे परिसंवाद आयोजित केला होता. तेव्हा स्व. बाळासाहेब हे शासकीय विश्रामगृहात आले होते. तेव्हा पदाधिकाऱ्यांना जवळ बोलावून आपुलकीने, मायेने शाबासकीची थाप मारली. 1990 साली चंद्रकांत पवार यांच्या प्रचार्थासाठी रात्री अडीच वाजता छ. शिवाजी स्टेडियमवर आले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here