काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात होऊ शकते टक्कर !

0

नवी दिल्ली : १७ ऑक्टोबरला निवडला जाणार आहे. यावेळी पक्षाची धुरा बिगर गांधी परिवाराकडे असेल की गांधी परिवारच काँग्रेसचं नेतृत्व करेल याची चर्चा जोरात आहे.
प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार खासदार शशी थरुर पक्षाच्या अध्यक्षपदाची दावेदारी सादर करू शकतात. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत शशी थरूर या निवडणुकीत त्यांना आवाहन देऊ शकतात.
राहुल गांधी उमेदवारी दाखल न करण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. या स्थितीत अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यापैकी कुणाचं पारडं जड असेल याची उत्सुकता आता वाढली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

“काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मी ठरवलं आहे. लवकरच अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर करेन. आताची देशातील स्थिती पाहता विरोधक सक्षम असले पाहिजेत,” असं अशोक गेहलोत म्हणाले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून काँग्रेस अध्यक्षपद रिक्त असून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

पण 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अध्यक्ष मिळालेला नाहीये.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस अध्यक्षपद रिक्त आहे आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तीन वेळा अंतर्गत निवडणुका जाहीर झाल्या आणि तिन्ही वेळेस पुढं ढकलण्यात आल्या. पक्षाने अध्यक्ष निवडीसाठी 21 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही निवडणुक पुढं ढकलण्यात आली.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये नवा अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुका होऊ शकतात.

गेहलोत यांच्यासाठी हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही..

राजस्थान काँग्रेस सध्या गटबाजीचं राजकारण सुरू असून सचिन पायलट यांनी वेळोवेळी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय.

राजस्थानचं राजकारण जवळून पाहणाऱ्या वरीष्ठ पत्रकार त्रिभुवन यांच्या मते, “गेहलोत यांना राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सोडून काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याचा निर्णय घेणं सोपं नसेल.”

त्रिभुवन सांगतात की, “सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र राजस्थानचं राजकारण पाहता गेहलोत यांना अध्यक्षपदाचा प्रस्ताव तितकासा फायद्याचा वाटणार नाही. किंबहुना हे पद स्वीकारताना ते तेवढे खुश नसतील.”

तसं पाहायला गेलं तर मुख्यमंत्रिपदावरून थेट पक्षाच्या अध्यक्षपदी पोहोचणं ही राजकीय प्रगती म्हणता येईल. मात्र तसं नसून गेहलोत यांचा उतरणीला लागलेला प्रवास म्हणून देखील याकडे पाहता येऊ शकतं.

त्रिभुवन सांगतात, “राज्याच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा काँग्रेसचं अध्यक्षपद केव्हाही मोठंच म्हणता येईल. मात्र तरीही अशोक गेहलोत यांच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झली आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. अध्यक्षपद किती मोठं का असेना त्याने काही फरक पडणार नाही. उलट गेहलोत अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांची पराभूत अशी प्रतिमा उभी केली जाईल.”

अशोक गेहलोत अध्यक्षपदावर बसल्यावर काँग्रेसच्या दोन अडचणी सुटतील. एकतर तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर नेहरू – गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीची वर्णी लागेल. आणि त्यातून घराणेशाहीच्या आरोपांवर उत्तर मिळेल. आज दुसरं म्हणजे राजस्थान मधले अंतर्गत वाद मिटतील. गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अंतर्गत राजकारण सुरू असल्याचं सर्व देशाने पाहिलंय. गेहलोत अध्यक्ष बनल्यावर सत्ताविभाजन होईल आणि गटबाजी थांबेल. मात्र जेवढं वाटतं तेवढं ते सोपं नसल्याचं बऱ्याच विश्लेषकांना वाटतं.

यावर त्रिभुवन सांगतात, “गेहलोत यांना अध्यक्ष बनवून दिल्लीला पाठवायचं आणि सचिन पायलट यांच्याकडे राज्याचा कारभार सोपवायचा हा सोपा पर्याय असला तरी तो सोपा नाहीये. म्हणजे राजकारण एवढं सरळ आणि सोपं नसतं. आपल्या विरोधकाला मुख्यमंत्री पदावर बसवून गेहलोत दिल्लीला जाणं शक्यचं नाही.”

तर दुसरीकडे वरिष्ठ पत्रकार अर्चना शर्मा सांगतात, “काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी हायकमांडने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेहलोत दिल्लीला गेल्यावर पायलट यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्री बनवून गटबाजी संपवली जाईल. त्यांनां दोन्ही गट एकत्रितपणे पुढील विधानसभा निवडणुकांना सामोरं जातील.”

अर्चना सांगतात, “राजस्थानचा नियमचं आहे की तिथे दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. अशा परिस्थितीत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. वर्षभरानंतर निवडणुका लागतील तेव्हा भाजपचं तगडं आव्हान काँग्रेस समोर असेल. अशावेळी अंतर्गत राजकारण थांबलच तर आव्हानसाठी पक्ष मजबूत स्थितीत राहील.”

पायलट यांच्या तंबूत उत्साहाचं

डिसेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोघांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकला होता.

यात बरेच दिवस रस्सीखेच चालली आणि यात अशोक गेहलोत जिंकले. तर भविष्यात काही तरी चांगलंच होईल या आश्वासनावर सचिन पायलट यांनीही समाधान मानलं. आता गेहलोत दिल्लीला जाणार म्हटल्यावर सचिन पायलट यांच्या तंबूत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सचिन पायलट

अर्चना शर्मा सांगतात, “गेहलोत दिल्लीला जाणार या बातमीनंतर पायलट यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं भरतं आलं आहे. काल पायलट यांच्या काही समर्थकांनी ‘राजस्थान मांगे पायलट’ अशा आशयाचे ट्वीट केले आहेत. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री असलेल्या विश्वेंद्र सिंह यांचा मुलगा अनिरुद्ध सिंह याने पायलट यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलंय. अनिरुद्ध सिंह पायलटचे कट्टर समर्थक असून प्रसंगी ते आपल्या वडिलांच्याही विरोधात गेले आहेत.”

“राहुल गांधींनी पायलट यांच्या संयमी वृत्तीची स्तुती केली होती तेव्हाच राजस्थानमध्ये काहीतरी घडेल अशी अटकळ बांधली जात होती. आता गेहलोत दिल्लीला जाणार म्हटल्यावर पायलट समर्थकांमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. आणि आता पायलट यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील असंही म्हटलं जातंय.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here