कांदा पीक चर्चासत्रास परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे शेतकरी बांधवांसाठी पार पडलेल्या कांदा पीक चर्चासत्रास परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.कृषी कक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इंडोफील इंडस्ट्रीज व टाकळीमिया  येथील मियासाहेब कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कांदा पिक चर्चासत्र पार पडले.

           यावेळी इंडोफिल कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह राजेश जाधव, डिमांड जनरल एक्झिक्युटिव्ह किशोर लोहार, कमर्शिअल ऑफिसर संतोष बनकर, शेतकरी संघटनेचे कारभारी कणसे, लाख-त्र्यंबकपुरचे सरपंच बबन आढाव, संदीप शिरसाठ आदी उपस्थित होते. सर्वांचे स्वागत मियासाहेब कृषी सेवा केंद्राचे संचालक विलास आढाव यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना कांदा पिका संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरासन केले.

          यावेळी चंद्रकांत आढाव, ज्ञानदेव आढाव, निलेश आढाव, भगवान कोळसे, चंद्रशेखर खाडे, महेश कोळसे, दीपक आढाव, अजित आढाव, अशोक निमसे, सचिन शिंदे, प्रफुल्ल भवाळ,  गणेश आढाव, विकास जाधव, छगन आढाव आदींसह टाकळीमिया, जातप व त्रिंंबकपूर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here