उरण दि १५(विठ्ठल ममताबादे ): जेएनपीए(जेएनपीटी )हे देशातील सर्वात आघाडीचे बंदर असून या बंदरात अनेक सेवा सुविधा पुरवण्याचा जेएनपीए प्रशासनाचा प्रयत्न सुरूच आहे. उरण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या शेत जमिनी या प्रकल्पसाठी दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी कर्मचारी पदाधिकारी स्थानिक नागरिक यांच्या विकासासाठी जेएनपीए प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी जेएनपीए मधील मल्टीपर्पज हॉलच्या बाजूला मोठे प्रशस्त व सर्व सुख सुविधांनी युक्त सुसज्ज असे लग्न समारंभ इतर कार्यक्रमासाठी लागणारे किचन व डायनिंग व्हायला पाहिजे अशी संकल्पना मांडत सदर किचन आणि डायनिंग हॉलसाठी त्यांनी जेएनपीए प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
या कामी विश्वस्त रवि पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील यांनीही आपापल्या परीने पाठपुरावा केला होता. शेवटी सर्व विश्वस्तांचे मागणी व स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे भावना लक्षात घेता जेएनपीए प्रशासनाने जेएनपीए मल्टीपर्पज हॉलच्या शेजारी भव्य दिव्य व सर्व सेवा सुविधा युक्त असे किचन व डायनिंग हॉल बांधण्यास मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच अल्ट्रोप्रो इन्फ्रास्टॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सीजीएस कन्स्ट्रॅकशनचे सब कॉन्ट्रॅक्टर विकास नाईक यांनी उत्तम व सुंदर असे किचन आणि डायनिंग हॉल बांधले. या किचन व डायनिंग हॉलचे उदघाटन जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते फीत कापून झाले. याप्रसंगी जेएनपीए चे विश्वस्त दिनेश पाटील,विश्वस्त रवी पाटील, माजी विश्वस्त भूषण पाटील,ऍडमिनिस्ट्रेशन विभाग प्रमुख मनीषा जाधव, ट्रॅफिक विभागाचे गिरीष थॉमस, एम अँड ई ई चे सुरेश बाबू, पिपीडी विभाग प्रमुख डॉ. वैद्यनाथन, डॉ संजय उगले, जेएनपीए हॉस्पिटल इन्चार्ज डॉ वर्षा यादव,अल्ट्रोप्रोचे कवळजीत सेन, सीजीएस कंट्रकशनचे सब कॉन्ट्रॅक्टर विकास नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी विश्वस्त दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगत सांगितले की आजकाल कुठेही लग्न समारंभला पाच लाख,दहा लाख खर्च येतो. जेवणाचे मंडप, जेवणाचे किचन यासाठी मोठा खर्च असतो. हा खर्च सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीयांना परवडत नाही.त्यामुळे येथे सुसज्ज असे किचन व डायनिंग हॉल व्हावे अशी मागणी पुढे आली त्यातूनच आज भव्य दिव्य किचन व डायनिंग हॉल साकार झाले आहे.
एकाच वेळी ३०० लोक येथे जेऊ शकतील येवढी चांगली व्यवस्था येथे आहे. याचा फायदा जेएनपीटी परिसरातील नागरिक, जेएनपीए कर्मचारी अधिकारी यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे मात्र जेएनपीए प्रशासनाने या हॉलचे चांगले नियोजन करावे, मेटेनन्स करावे असे मत व्यक्त केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले उन्मेष वाघ यांनी सदर किचन व डायनिंग हॉलच्या कामाचे व सेवा सुविधांचे विशेष कौतुक केले व अल्ट्रोप्रो कन्सट्रक्शन व सीजीएस कन्सट्रक्शनच्या ठेकेदाराचे विशेष आभार मानले. आपल्या भाषणात उन्मेष वाघ यांनी सांगितले की हे भव्य दिव्य सर्व सुविधानी सुसज्ज असे किचन व डायनिंग हॉलचा फायदा जेएनपीएचे कर्मचारी, अधिकारी, प्रकल्पग्रस्त यांना होणार आहे शिवाय जेएनपीए च्या आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील याचा फायदा होणार आहे. सर्वांना उपयुक्त असे हॉल आहे. कोणतेही कार्यक्रम येथे घेतले जाऊ शकतात. त्यातून उत्पन्न मिळेल. मिळालेल्या उत्पन्नचा फायदा हॉलच्या मेटेनन्स,देखभाल दुरुस्ती साठी केली जाईल.बाहेर कुठेही लग्नाला १० ते १५ लाख खर्च येतो. येथे मात्र तो खर्च वाचणार आहे. लवकरच हॉल मध्ये एसी बसविण्यात येणार आहे. या हॉलच्या कामासाठी दुरुस्ती व देखभाल साठी सुद्धा टेंडर काढण्यात येईल. या हॉलला लागून असलेल्या क्रिडांगणाला सुद्धा नवा लुक देण्यात येईल. जेएनपीए परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सीबीएससी बोर्डाचे शाळा सुरु करण्यात येणार आहे.असे उन्मेष वाघ यांनी सांगितले.सर्वात शेवटी उपस्थित मान्यवरांचे पीपीडी विभाग प्रमुख डॉ. वैद्यनाथन यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप झाला.