कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ?

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अजित दादांसमोरच शरद पवारांचे नाव न घेता टीका

शिर्डी/ कोपरगाव : ९ वर्षांपूर्वी देशातील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरलं जात होत . आणि त्यावेळी राज्यातील एक नेते देशाचे कृषिमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले . असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना केला .

आज शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाजवळ आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी नमो योजना जाहीर केली . त्यावेळी शेतकऱ्यांना संबोधताना मोदी यांनी शरद पवारावर टीका केली. मोडी पुढे म्हणाले की

देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत असून मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केले नाही. देशातील गरीब परिवारांना पुढे जाण्याचा योग येवो हे आमचे ध्येय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचा बजेटही वाढत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरीबांना मोफत उपचारांसाठी 70 हजार कोटी खर्च केले असून गरीबांच्या घरांसाठीही सरकारने 40 लाख कोटी रूपये खर्च केले. हर घर जल पोहोचवण्यासाठीही आतापर्यंत 2 लाख करोड रूपये खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आत एकूण 12000 रूपये मिळतील. आपल्याला शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागून थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले आहे. महाराष्ट्राला 5 दशकांपासून ज्या निळवंडे धरणाचे वेध होते, ते काम आज पूर्ण झालं. ज्या कामांचं भूमिपूजन मी केलं, त्याच उद्घाटन करण्याचा योगही मलाच आला. आज जेव्हा या डॅममधून पाणी सुरू झाले, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. आता एक थेंबही वाया घालवू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना करत आम्ही चांगल्या नियतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो, मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले, परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडे तेरा लाख कोटी रुपयाच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here