सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयास गणपत हरिभाऊ पालवे आशापुर यांच्याकडून आपले वडील कै.हरिभाऊ रावबा पालवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यालयास सिंगल बार,डबल बार व्यायाम साहित्य भेट देण्यात आले. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी गणपत पालवे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची खरी गरज ओळखून व आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड लक्षात घेऊन आमचा विद्यार्थी कुठेही कुचकामी ठरू नये. यासाठी त्याची शारीरिक क्षमता परिपूर्ण होण्यासाठी त्यांनी देवू केलेले साहित्य हे आम्हासाठी एक अत्यंत उपयोगी ठरेल व आमचे* *विद्यार्थी भविष्यात त्याचा निश्चितच उपयोग करून आपले स्वप्न साकार होईल असे आश्वासन देवू केले.
विद्यालयातील माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी भूदलात जवळ-जवळ २५० विद्यार्थी सेवेत आहे. त्यांची शारीरिक क्षमता व तयारी यासाठी आपल्या साहित्याचा निश्चितच उपयोग होईल. दररोज शालेय वेळे व्यतिरिक्त विद्यार्थी या साहित्याचा दीड तास अधिक वेळ देऊन सराव करतील व शारीरिक क्षमता व व्यायाम प्रकाराचे ज्ञान वाढीस लागेल.असे मत गणपत पालवे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .
यावेळी कै.हरिभाऊ रावबा पालवे यांच्या कुटुंबातील रामदास पालवे, गणपत पालवे दत्तात्रय पालवे अनिल पालवे उपस्थित होते. संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, शिक्षक बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी, एम.सी.शिंगोटे, एम.एम.शेख, सौ.सविता देशमुख,टी.के.रेवगडे, सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे, आर.एस. ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.