कोपरगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी.. अ. नगर यांच्या मार्फत गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी कोपरगांव येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या तालुका क्रीडा शिक्षक सहविचार सभेमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारि व तालुका क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी सदर बैठकीत उपस्थित क्रीडा शिक्षक,मार्गदर्शक, संघटना प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सन..2024/25.. या शैक्षणिक वर्षासाठी शालेय शासकीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यकारणी जाहीर केली..
पुढील प्रमाणे निवड झालेली समिती..
अध्यक्ष – नितीन निकम उपाध्यक्ष – निलेश बडजाते,सुधाकर निलक, अजित पवार, संजय अमोलिक.. सचिव व तालुका प्रसिध्दी प्रमुख- अनुप गिरमे सहसचिव – देवेंद्र भोये, रविंद्र नेदरे, मिलिंद कांबळे,भीमाशंकर औताडे.. सदस्य – अशोक गायकवाड, राजेन्द्र देशमुख, शिवराज पाळणे, विरूपक्ष रेड्डी, किरण बोळींज.. महिला प्रतिनिधी – कु. अस्मिता रायते.. जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रतिनिधी – शिवप्रसाद घोडके. अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली..
या वेळी कोपरगांव क्रीडा समितीचे जेष्ठ मार्गदर्शक अ. नगर जिल्हा शारीरिक व क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष आदरणीय अरुण चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित क्रीडा मार्गदर्शक दिलीप घोडके, मा.मुख्याध्यापक मकरंद कोराळकर, प्रा. अंबादास वडांगळे, सुभाष पाटणकर, नारायण शेळके, राजेंद्र पाटणकर, चंद्रकांत शेजुळ हे जेष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.. यावेळी शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये सेवानिवृत्त झाल्याबद्दल मकरंद कोराळकर सर, नारायण शेळके सर, चंद्रकांत शेजुळ सर, राजेंद्र पाटणकर सर यांचा तालुका क्रीडा समितीच्या वतीने भाऊराव वीर सर यांनी सत्कार केला.. प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी प्रकाश जाधव सर उपस्थित होते.. तसेच सदर सह विचार सभेला तालुक्यातील विविध शाळेतील तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक मार्गदर्शक उपस्थित होते सर्वांचे उपस्थितीत नवीन कार्यकारणी अध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सन्मान करण्यात आला..