कोपरगाव : तालुक्यामध्ये सध्या सर्वसामान्य नागरिकांना आजी माजी आमदारांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे खोटे सांगून नागरिकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती गोळा करीत असून हि माहिती काही समाज विघातक कृत्यासाठी वापरली जाऊ शकते . अशी त्यामुळे अशा फसव्या फोन कॉल पासून नागरिकांनी सावध राहावे आणि आपली वैयक्तिक माहिती कोणाही अनोळखी व्यक्तीस फोनवरून अथवा प्रत्यक्ष देऊ नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनतेला केले आहे . त्याच प्रमाणे असे फसवे फोन करणाऱ्यांना विरोधात आपण पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे . <p>काळे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना पुढे म्हटले काही दिवसा पूर्वी एका अनोळखी नंबर वरून मला कॉल आला.. माझे नाव घेऊन मला वाढदिवस कधी असतो तारीख विचारली.. मी विचारलं कोण बोलतं .. तर त्या बाई म्हणाल्या विद्यमान आमदार यांच्या संपर्क कार्यालयातुन बोलते… तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तारीख पाहिजे.. मी माझी वाढदिवसाची तारीख देण्यासाठी नकार दिला.. फोन कट केला..
*आज कळस झाला.. मला एका महीलेचा ८१८१९०९०९० ह्या क्रमांक वरून कॉल आला.. माजी आमदारांच्या संपर्क कार्यालयातुन बोलते असे मला सांगितले.. त्या महिलेने माझ्या पत्नीच्या वाढदिवसाची तारीख मागितली.. मी विचारलं कशासाठी.. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी.. मी चिडून त्या महिलेला पोलिसात तक्रार करणार म्हणून फोन बंद केला. इथपर्यंत सर्व ठीक आहे मात्र शंका येथेच निर्माण होते .खरच हे कॉल आजी/माजी आमदारांचे संपर्क कार्यालयातून करतात..
यांना माझा नंबर कसा मिळाला ? वाढदिवस विचारल्यानंतर माझ्या पत्नीचा मोबाईल क्रमांक तर मागणार नव्हते ना ? त्या महिलेला माझ्या पत्नीचे नाव कसे कळाले ? ही शहरात टोळी तर आली नाही ना ? महीलांचे वाढदिवस घेऊन त्यांना ब्लॅकमेल तर करीत नाही ना ?
<p>कोपरगावची भोळी जनता आजी/माजी आमदारांचे नाव घेतले की विश्वासाने सत्य सांगतात.. मग ते आपल्या घरातील तरुणींचे क्रमांक डोळे झाकून देतील..
पण जर आजी/माजी आमदार खरच हे महिलांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन क्रमांक घेत असतील तर कायदेशीर असा अधिकार आहे काय ? यांच्याकडे जनतेने दिलेली महिलांची माहीती सुरक्षीत आहे काय ? आजी/माजी आमदारांनी आपल्या आजुबाजुला असलेल्या कार्यकर्त्यांचे परिक्षण करावे. ते ह्या माहीतीचा दुरूपयोग करुन महिलांना त्रास देणार नाही कशा वरुन ?
आणि खरेच आजी /माजी आमदारांना जनतेच्या वतीने आवाहन आहे की वाढदिवस विचारुन कार्यालयातुन त्या दिवशी फोन करुन जनतेची किती काळजी आहे दाखवण्यापेक्षा गुणवत्तेत काम करा. चांगल्या सुविधा द्या..
जनता तुमच्या तिसऱ्या पिढीवर विश्वास ठेऊन आशेने पहाते.. विकास शोधते.. वाढदिवसाला शुभेच्छा देणे म्हणजे विकास नाही. आजवर गाव दहिहंडी पासून असुरक्षिततेच्या भिती खाली वावरते आहे.. आता महिला असुरक्षित करण्याचाअधिकार यांना कोणी दिला?
मी श्री साईबाबा कडे प्रार्थना करतो की हा कॉल त्यांचे कडून नसावा व त्यांनीच त्या वरील नंबरवर गुन्हा दाखल करावा. आणि जनतेला माझा प्रामाणिक सल्ला आहे की आपल्या घरच्या लक्ष्मीचा वाढदिवस , मोबाईल नंबर अथवा व्यक्तीगत घरगुती माहीती कुणाला ही देऊ नये.. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. आपल्या कडे अनेक एजंट आपली घरगुती माहिती विचारण्याकरिता घरी येतील अथवा फोनवर विचारतील. त्यामुळे शासकीय कर्मचारी सोडून या अनोळखी व्यक्तींना खासगी माहिती देऊ नका.
Home महाराष्ट्र कोपरगाव तालुक्यात आजी माजी आमदारांच्या नावाने खाजगी माहिती गोळा करणारी टोळी सक्रिय...