कोपरगाव ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे : शिंदे

0

कोपरगाव : कोपरगाव ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी व १६० चे रस्ता दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे, या कामासाठी जड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे. ह्या महामार्गाचे डागडुजीचे काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसे अपेक्षेप्रमाणे होत नाही असे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार व इतर यांना निदर्शनास आणून दिलेले आहे. वारंवार दुरुस्ती करताना शासनाचा अमाप पैसा खर्च होत आहे. हे काम उत्कृष्ट दर्जाचे जर केले तर लोकांना मनस्ताप होणार नाही आणि पैसाही वाचेल, पण लोकप्रतिनिधींचा कॉन्ट्रॅक्टर शासकीय अधिकारी यांच्यावर अंकुश का नाही याबाबत शंका निर्माण होण्यासारखे आहे. ज्याप्रमाणे पुर्वी कै. शंकररावजी कोल्हे,कै.शंकररावजी काळे, कै.बाळासाहेब विखे साहेब कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांना कामाबद्दल जाब विचारत असत तसे आत्ताचे लोकप्रतिनिधी आजी व माजी खासदार, आमदार हे अधिकाऱ्यांशी वैर घेण्याची जाब विचारण्याची तयार दिसत नाही याबाबत काही गौड बंगाल तर नाही ना..? अशी शंका सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे, कारण एखादा शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याच्या कार्यक्रमाला यांची उपस्थिती हमखास असती पण रस्ता व महामार्गाबाबत च्या निकष व कामाबद्दल लोकप्रतिनिधी काहीही बोलतांना व जाब विचारताना दिसत नाहीत. हे सर्व काही शंका घेण्यासारखेच आहे.हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे कॉलिटी बाबत खासदार विखे व लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारावा हे सर्व सामान्यांना अपेक्षित आहे. तसेच आजी-माजी आमदार नी ही याबाबत मौन धरून बसू नये ?.

अहमदनगर कोपरगाव हा रस्ता पूर्वी जागतिकी बँकेकडे वर्ग होता आता तो राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे. त्यातच चारशे कोटीचे बजेट आता चौदाशे कोटी पर्यंत गेलेलं आहे. हे सर्व सामान्य माणसाला, अचंबित करणारी आकडेवारी आहे. त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा अशी अपेक्षा व मागणी नितीनराव शिंदे, कोपरगांव तालुकाध्यक्ष, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here