कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी एकूण चार जणांना अटक केली असून बोगस डॉक्टर विजय कोळूस्कर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस पथकाकडून ही गर्भलिंग निदान करण्याचे यंत्र आणि गर्भपाताची औषधे सापडली असून याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्दमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य पथक आणि जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधा सापळा रचून विजय लक्ष्मण कोळस्कर यांच्याकडे गर्भलिंग तपासणीसाठी एका महिलेला पाठवण्यात आले, त्यानंतर कोळस्कर याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली.