पोहेगांव : कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून सध्या जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची शोधाशोध करण्यासाठी शेतकऱ्यांशी वनवन होत आहे. सोनेवाडी परिसरात गिन्नी गवताच्या उपलब्मुधते मुळे जनावरांना व पशुपालकांना आधार मिळत आहे.
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चिलुभाऊ जावळे व सौ शकुंतला जावळे यांच्याशी जनावरांच्या चाऱ्या संदर्भात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की. शेतकरी जनावरांना लागणारा चारा रब्बी हंगामातच मका ज्वारी कपाशी अदी पिकांचा मुरघास करून त्याची साठवणूक करून ठेवतो. मात्र मागील वर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे रब्बीमध्ये पिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वनवन झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना मुबलक चारा मिळण्यासाठी शेतीमध्ये पाच ते दहा गुंठे सुपर नेपियर गिन्नी गवताची लागवड केली.
हे गिन्नी गावत एकदा कापल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात पुन्हा कापणीला येत असल्याने जनावरांच्या चाऱ्याला मोठा आधार मिळाला आहे. सध्या दूध धंदा अडचणीत आला असल्याने दुधाला भाव मिळत नसल्याने पाच ते सहा हजार रुपये टन भावा प्रमाणे उस आणणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चिलूभाऊ जावळे यांनी सांगितले.