कोपरगाव – प्रत्येक जिल्हा परिषद गुणवंत पुरस्कार प्रत्येक तालुका निहाय देऊन एक वेतन वाढ देते. एक वेतन वाढ जादा मिळावी म्हणून अनेक जण आपापल्या शाळेत खूप सुंदर काम करतात आणि फाईल बनवून शिफारस मिळून एकदा का गुणवंत पुरस्कार आणि वेतन वाढ मिळाली की या गुणवंत पुरस्कार शिक्षकांची कार्यक्षमता लगेचच संपते असे निदर्शनास येत आहे. म्हणून अशा गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांची त्यांनी पुरस्कार घेतल्यापासून पुढील दहा वर्षाची कार्यक्षमता व काम तपासावे व पहिल्या पाच वर्षात उल्लेखनीय कार्य व परिपत्रकाप्रमाणे कार्य केले नसल्यास त्यांच्याकडून दिलेली वेतनवाढ व्याजासह वसूल करून त्यांच्यावर शासन व समाजाची फसवनुक <p>केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे व ईमेल व्दारे अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस अनु.जाती विभागाच्या जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांनी केली आहे. निवेदनात त्यांनी शालेय वेळेमध्ये शिक्षकांचे मोबाईल बंद ठेवण्याची मागणी केली आहे. शिक्षकांचा शाळेमध्ये मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा मुलांच्या शिक्षणावर प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. प्रशासकीय गोष्टीसाठी मोबाईल वापरावा लागतो यासबबी खाली शिक्षकांचा मोबाईल वापर फार वाढलेला आहे. लवकरात लवकर या मागणीचे विचार करून मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबधित विभागांना आदेश करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांची कार्यक्षमता तपासावी — सविता विधाते