ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा- खोपटे तर्फे महिला बचत गट आणि दिव्यांगांना शिलाई मशीन आणि युपीएस सह एल ई डी बल्प चे वाटप.

0

उरण दि 1(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील बांधपाडा ग्रुप ग्राम पंचायतीच्या वतीने शासनाच्या 15 वा वित्त आयोग व महिला बालकल्याण /दिव्यांग सेस निधीतून 62 दिव्यांगांना सोलर यूपीएस मशीन सह 3 एलईडी बल्प तसेच 50 महिला बचत गटांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले.

     तीन वर्षांपूर्वी थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर आणि उपसरपंच  सुजित  भालचंद्र म्हात्रे आणि विद्यमान दहा सदस्यांच्या टीमच्या माध्यमातून कोरोना काळात आपल्या ग्रामस्थांच्या जीवाला प्राधान्य देत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, कोरोना प्रतिबंधक किट, गावात सॅनिटायझर फवारणी, लसीचा एक डोस, अश्या सर्वोतोपरी सुविधा देण्यात आले.पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत आंबा काजू नारळाची झाडे लावण्यात आली.घरोघरी कचराकुंडी वाटप आणि शाळेच्या नवीन वास्तुसाठी निधी मिळविण्याचे कार्य करून उर्वरित कार्यकाळात ग्रामपंचायतीतर्फे गावासाठी रुग्णवाहिका आणि घंटागाडी देण्याचे अभिवचन देण्यात आले.

        ग्रामपंचायत खोपटे तर्फे आयोजित या कार्यक्रमात सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे यांच्या समवेत भावना पाटील,राजश्री पाटील, देवानंद पाटील, शुभांगी ठाकूर, रितेश ठाकूर, अच्युत ठाकूर, मीनाक्षी म्हात्रे, करिष्मा म्हात्रे, संदेश म्हात्रे, जागृती घरत या ग्रामपंचायत सदस्यांसंमवेत ग्रामविकास अधिकारी रूपम गावंड, गाव कमिटी अध्यक्ष विश्वनाथ पाटील,उपाध्यक्ष कमलाकर म्हात्रे, सचिव कुमार ठाकूर, पाणी कमिटी अध्यक्ष महेंद्र पाटील, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष प्रमोद ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, यशवंत ठाकूर,संतोष पाटील, निलेश भगत असे पाडा अध्यक्ष तथा  महिला बचत गट पदाधिकारी व सीआरपी आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन देवानंद पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, दिव्यांग प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here