देवळाली प्रवरा /प्रवरा
देवळाली प्रवराचे आप्पासाहेब ढुस यांच्या घरात बळजबरीने घुसून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डिग्रस दत्ता सोपान पटेकर येथील एकाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब भीमराज ढुस यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले की, डिग्रस येथील दत्ता सोपान पटेकर याने ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तुझ्यावर खोटा अट्रोसिटीचा दाखल करतो असा दम दिला व गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीची ३ तोळे वजनाची सोन्याची साखळी घेऊन गेला.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात रा आप्पासाहेब ढुस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता सोपान पटेकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२८,४५२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ढुस याने देवळाली प्रवरा पोलिस चौकीत दत्ता सोपान पटेकर याच्या विरोधात अदखल पाञ गुन्हा दाखल केला होता.एक दिवसा नंतर पुन्हा घरात घुसुन सोने लुटून नेल्याचा व जीवे मारण्याचा राञी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.