घे भरारी महिला ग्रुप तर्फे रांजणखार येथे जागतिक महिला दिन संपन्न

0

अलिबाग प्रतिनिधी,

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घे भरारी ग्रुप रांजणखार यांच्या प्रयत्नातून दिनांक ८ मार्च २०२५ शनिवार रोजी रांजणखार गावामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे तसेच यशस्वी १० वी १२वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील सन २०२४ ते २०२५ या वर्षात देवाज्ञा झालेल्या ग्रामस्थांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदरील या कार्यक्रमासाठी भारत भूषण पुरस्कार प्राप्त तसेच तेजस्विनी फाऊंडेशन संस्थापिका ॲड. जिविता सूरज पाटील या प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित राहिल्या.

यावेळी चिंचवली ग्रामपंचायत सदस्य राजेश विद्याधर म्हात्रे, ग्रामस्थ विजय बलराम म्हात्रे, सत्यवान पाटील, मधुकर पाटील, विलास म्हात्रे, रत्नाकर पाटील इ . मान्यवर उपस्थिती होते. यावेळी आपल्या मार्गदर्शनात ॲड जिविता पाटील यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन करीत असताना आज २१ व्या शतकातील प्रगतीच्या युगातही ग्रामीण भागातील काही ठिकाणी आजही महिलांनी फक्त चूल आणि मूल यामध्येच स्वतःला अडकवून ठेवले आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिलांनीच प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतः च्या पायावर सक्षमपणे उभे रहाण्यासाठी शिक्षणा सोबतच इतर कलाकौशल्यांना विकसित करणे आवश्यक असून महिलांनी स्वतःला सिद्ध केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महिला दिनाचे सार्थक होईल असे मत व्यक्त केले.

यावेळी रांजणखार गावातली कृतिका पाटील हिने हिरकणीचा सुंदर प्रसंग सादर करून उपस्थितांची मने हेलावली. स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. एकंदरीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घे भरारी महिला ग्रुप प्रमुख कांचन म्हात्रे, वृषाली म्हात्रे, श्रुतिका पाटील,निशा पाटील, विश्रांती पाटील, रुपाली पाटील, निलिमा पाटील, रुचिता म्हात्रे, मानसी पाटील, स्वेतली पाटील, अर्चना म्हात्रे या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन मच्छिंद्र म्हात्रे व अर्पिता (सुतरपाडा) हिने अतिशय सुंदर पद्धतीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here