सुदाम गाडेकर जालना :श्री क्षेत्र राजूर गणपती हे तालुका स्तराचे गाव असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची राजूरमध्ये गर्दी असते.
खरीप हंगामाच्या तोंडावर राजूर गणपती मध्ये कृषी सेवा केंद्र चालकांनी कपाशी बियाणांच्या वाण तुटवडा असल्याचे सांगत 860 रुपये किंमती चे कपाशी बियाणे 1400 ते 2500 रुपये एव्हढ्या चढ्या किंमतीला विकत आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांना चढ्या भावाने बियाणे विक्री होत असल्याची माहिती देण्यासाठी दूरध्वनी केला असता तर ते फोन केला उचलत नाही आणि .भोकरदनचे तालुका कृषी अधिकारी यांना फोन करून चढ्या भावाने बियाणे विक्री संदर्भात माहिती दिली होती. पण त्यांनी काहीच कार्येवाही केली नाही .उडवा उडवीचे उत्तर देऊन आपल्या जबाबदारी पासून पळ काढला . तसेच भोकरदन पंचयत समितीचे राजेश तांगडे यांचा फोन बंद करून ठेवला आहे .
आशा परिस्थिती कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार नाही .कृषी विभागाला व जिल्हा अधिकारी यांना शेतकऱ्यांनी चढ्या भावाने बियाणे विक्री संदर्भात निवेदन देऊनही दखल का घेतली जात नाही .
बियाणांचा साठा करून डीलर व दुकानदार तुटवडा असल्याचे भासवून शेतकऱ्यांना चढ्या भावाने विक्री जोमात सुरू आहे .
शेतकऱ्यांनी चढ्या भावाने बियाणे विक्री करण्यास विरोध केला तर त्याला बियाणे दिले जात नाही.बियाणे नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना हाकलून दिले जात आहे.
राजूर मध्ये चढ्या भावाने बियाणे विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक ,जिल्हा अधिकारी , यांना 29/5/2024 ला निवेदन शेतकऱ्यांनी दिले होते. परंतु अद्यापही कृषी विभाग चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही . तालुका कृषी अधिकारी भोकरदन यांना 1/6/2024 ला राजूर मध्ये चढ्या भावाने कपाशी बियाणे विक्री होत असल्याबाबत दूरध्वनीवरून माहिती मिळूनही त्यांनी दखल घेतली नाही .कृषी विभागाच्या आशीर्वादामुळेच कृषी सेवा केंद्र दुकानदार चढ्या भावाने बियाणे विकत आहे काय ?असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे .
भीषण दुष्काळ परिस्थिती पाहता कृषी विभागाने आता तरी डोळ्यावरची पट्टी बाजूला ठेवून राजूर मध्ये चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. बियाणांचा तुटवडा भासवून चढ्या भावाने बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा साठा तपासून ते बियाणे शासकीय किमतीत विक्री करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .