ठेवीवरील व्याजाच्या पैशातून दीड कोटी रुपयांची जागा व इमारत
सोनेवाडी प्रतिनिधी : सहकार क्षेत्रामध्ये चांदेकसारे विकास सोसायटी ही अग्रेसर संस्था असून सभासदांसाठी विविध योजना या संस्थेत राबवल्या जातात. समृद्धी महामार्गात बाधित झालेल्या इमारतीच्या पैशाचा योग्य विनियोग या संचालक मंडळांने केला आहे. या संस्थेची दिवसागणित प्रगती होत राहील असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांनी केले. ते काल चांदेकसारे येथे चांदेकसारे सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक संस्थापक रामदास पाटील होन होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष विवेक कोल्हे, नामदेव रावजी परजणे पाटील गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, श्री मेहेरे,बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, आनंदराव चव्हाण, काळे कारखान्याचे संचालक ॲड राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे ,सुनील शिंदे, केशवराव होन,संजय होन, ॲड गव्हाणे सरपंच किरण होन, उपसरपंच सचिन होन, प्राध्यापक विठ्ठल होन, साहेबराव होन, डॉक्टर गोरक्षनाथ रोकडे, कल्याण होन,वसंत दहे, हिराबाई जावळे, किरण पवार, जालिंदर चव्हाण, विठ्ठल जावळे, बाळासाहेब खांडगे, कांतीलाल होन, दादासाहेब गवारे, अर्जुन डांगे, सुधाकर होन,पुरोहित विनोद जोशी, संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन, उपाध्यक्ष राजाभाऊ होन, संचालक सुभेदार शांतीलाल होन, मोहन होन, जयद्रथ होन, मनोहर होन, सजन होन, दत्तात्रय होन, देविदास होन, रोहिदास होन, ज्ञानदेव होन, संस्थेचे विजय खरात, हिराबाई जावळे , मुन्नाभाई सय्यद, इंजिनीयर होन, श्री जोर्वेकर आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समृद्धी महामार्गत बाधित इमारतीपासून मिळालेला सर्व निधी संचालक मंडळांने विविध बँकेत ठेव म्हणून ठेवला होता. संस्थेला नवीन इमारत व्हावी म्हणून संस्थेने एक कोटी रुपयांची जागा खरेदी करत 50 लाख रुपयांची इमारत उभी केली. पाच गुंठे जागेत इमारत व उर्वरित 30 गुंठे जागेमध्ये नवीन प्रोजेक्ट उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन यांनी दिली. प्रा. विठ्ठलराव होन यांनी संस्थेला विविध प्रकारच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी रामदास पाटील होन यांनी प्रयत्न केले. त्यांना त्यावेळी स्वर्गीय भगीरथतात्या होन, माधवराव शिंदे, माजी आमदार के बी रोहमारे, विष्णू होन, नामदेवराव परजणे यांनी विशेष साथ दिली. आज संस्था सुस्थितीत असून संस्थेचा कारभार स्वच्छ आहे असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी संस्थेचे कौतुक करताना सांगितले की संस्था अत्यंत काटेकोर पणे सभासदांच्या हितासाठी प्रयत्न करत आहे. सभासदांनी संस्थेचे कर्ज घेतले पाहिजे त्यासाठी कुठल्याही प्रकारचा सिबील तपासले जात नाही असे त्यांनी सांगितले. डॉ गोरक्षनाथ रोकडे यांनी
संस्था जिरवा जिरवी साठी नसली पाहिजे. सभासदांना आर्थिक तोट्यातुन बाहेर काढणारी असली पाहिजे असे सांगितले. संस्थेसाठी योगदान देणाऱ्या घटकांचा यावेळी संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार शांतीलाल होन व लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक जयद्रथ होन यांनी मानले.
चांदेकसारे विकास सोसायटीची प्रगतीची कडे वाटचाल सुरू आहे. समृद्धी महामार्गात इमारत बाधित झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून या संस्थेच्या संचालक मंडळाने योग्य निर्णय घेतले. सभासदांसाठी मोफत विमा व बिनव्याजी कर्ज यामुळे संस्था चर्चेत आली. जुन्या अनेक अडचणींचा सामना या संस्थेने केला आहे मात्र आता सध्या ही संस्था सुस्थितीत असून महाराष्ट्रामध्ये एक नामांकित संस्था म्हणून चांदेकसारे सोसायटी ओळख निर्माण करेल… विवेक कोल्हे : अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह साखर कारखाना