गणेश माने वारणावती : सकाळी वैरणीसाठी गेल्यावर नदीकाठच्या शेतात गेल्यावर मगरचे दर्शन होतया दुपारी गवे शेतात रवंत करत असातात संध्यकाळी बिबटे भटक्या कुत्र्याच्या व पाळवी प्राण्यांच्या शोधात फिरतात सांगा जगायच कस!
चांदोली परिसरातील शेतकऱ्यांचा आता हा जिवन क्रम झालाय आता हे रोजच आशा घटना घडत आहेत वन विभागाचे कार्यालय आहे मात्र ते सदा ओस पडल्याले असतय अधिकारी नेहमी१०० किमी अंतरावर असणाऱ्या कार्यालयात असतात कि घरी हे त्यांनाच ठाऊक असत मोबाईल बंद करून जंगलात असल्याच मात्र भासवत असतात आणि प्राणी मात्र मानवी वस्तीत असतात सध्या येथील शेतकरी आता वन्यप्राण्या पासून सुरक्षित नाही हे सांगायला आता कोणत्याही भविष्यकारची किवा कुठल्या वैज्ञानिकाची गरज नाही .पण हे प्राणी तरी सुरक्षीत आहेत का त्यांना पुरेसा अन्न मिळते का हे पाहयला ही कोणी नाही
शनिवारी सकाळी चरण येथे मगर पकडण्यात आली दुपारी आपल्या बचड्याला दुध पाजत असलेले गवा खुंदलापूर ला जाताना लोकाना रस्त्यावरून दिसतोय पुन्हा संध्याकाळी रात्री बिबट्या मणदूर कॉलनी मध्ये फिरताना दिसतो . पण सध्य परिस्थिती पहाता काहनी अशी कि, गवा वन्यजीव चांदोली कार्यालयाच्या हद्दीत बिबट्या ढेबेवाडी (सातारा) कार्यालयाच्या रेजच्या हद्दीत आणि मगर प्रादेशिक शिराळा रेज च्या हाद्दीत पण सर्व घटना ह्या शिराळा तालुक्यातील आहेत त्यापण अवघ्या ५ ते १० किमी अंतराच्या चांदोली परिसरातील अभयअरण्य व वन्यजीव कार्यालया शेजारच्या संपर्क साधयाचा कुणाला प्रत्येक अधिकारी आपली जवाबदारी झटकताना दिसुन येत आहेत वरिष्ठ मात्र तुम्ही जगा व वन्यप्राण्यांना जगु द्या हा मोलाचा सल्ला घरी बसुन फोन वरूनच देत आहेत
या मुळे चांदोली परिसरातील शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे दररोज काही ना काही तरी वन्य प्राण्याकडून घटना घडत असते ना प्रशासनला याकडे लक्ष द्यायला वेळ आहे ना वनविभागाला सर्व व्यस्तच असतात पण कोणतीही विपरीत घटना घडण्या आदोगर येथील लोकांना प्रबोधन करण्याची गरज आहे परंतु वन विभागाच्या तीन कार्यालयाचा मेळ कसा बसणार ? अशीच परिस्थिती शाहुवाडी तालुक्यातील चांदोली परिसरातील आहे शाहूवाडी प्रादेशिक वन्यजीव आंबा व आणि चांदोली रेज असाच प्रकार आहे या कार्यालयाचा ही समनवय नाही तर मग या भागातील वन्य प्राणी व मानव संघर्ष कमी कसा होणार ? याकडे प्रशासनाने प्राणीमित्रानी तसेच मानद सचिवानी याकडे घरी न बसता गार्भियाने लक्ष देण्याची गरज आहे