गणेश माने वारणावती : शिराळा तालुक्यातील भू :स्ख्यलन सदृश्य परिस्थिती असणाऱ्या मिरुखेवाडी, कोकणेवाडी,भा ।ष्टेवस्ती सह अन्य ठिकाणच्या लोकांनी सतर्क रहावे,प्रशासन सर्व उपायोजनासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्त यांच्यासह या विभागातील आणि सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू तसेच वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी ठोस उपाय योजना कायम स्वरूपी व्हावी. यासाठी निधी उपलब्ध करून चर खुदाई करू, तसेच याठिकाण चे अन्य असणारे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजा दयानिधी केले.
शिराळा तालुक्यातील भू :स्खलन चा धोका असणाऱ्या मिरुखेवाडी,कोकणेवाडी या गावांना भेटी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिल्या.तेथील लोकांशी संवाद साधला व अडचणी समजावून घेतल्या प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक,जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख, माजी जि. प सदस्य रणधीर नाईक, उपवन सरक्षक प्रादेशिक अधिकारी निता कट्टे,सहाय्यक वन अधिकारी अजित कुमार साजणे, विभागीय वन अधिकारी काळे,विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक, पुनर्वसन अधिकारी उमेश पोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार शामलाताई खोत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राजा दयानिधी म्हणाले :- मिरुखेवाडी, कोकणेवाडी गावाला भूउत्खननाचा धोका असल्याने प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेतली जाईल. बचाव साहित्य उपलब्ध उपलब्ध करू देऊ.सॅटॅलाइट फोनची व्यवस्था केली जाईल.पावसाळ्यामध्ये होणारी अडचण लक्षात घेऊन तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू.खुंदलापूर धनगरवाडा कोअर जोन मधून कमी करण्याबाबत शासनाकडे असणारा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देऊ. मणदूर धनगरवाडा येथील जमिनी चा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून तो प्रश्न मार्गी लावू.
शिवाजीराव नाईक म्हणाले :- प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न गेली 25 वर्षापासून प्रलंबित आहेत.सातत्याने पाठपुरावा केला जातो परंतु ठोस उपाय योजना होत नाहीत.या ठिकाणच्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. शेतीचे व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मणदुर धनगरवाड्याच्या जमिनीचा प्रश्न वनविभाग व महसूल विभाग यांच्यामध्ये अडकून पडला आहे. तो लवकरात लवकर सोडवला जावा. जानाईवाडी च्या 9 कुटूंबाचे स्थलांतर प्रशासनाने लवकर करणे आवश्यक आहे.
सत्यजित देशमुख म्हणाले – खुंदलापूर धनगरवाडा गावातील लोकांनी सामूहिक निर्णय घेऊन स्थलांतर न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा कोअर जोन चा शेरा काढून लोकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा देण्यात याव्यात.मणदूरसह डोंगर कपाऱ्यामध्ये असणाऱ्या सर्वच गावांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात होत आहे.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना कराव्यात. शेतकऱ्यांच्या पिकांचे व भात रोपांचे देखील नुकसान वन्य प्राणी मुळे झालेले आहे. पावसाळ्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक गावाचा विज पुरवठा खंडीत होत असतो. त्यासाठी नवीन उपाय योजना करणे आवश्यक आहे. मणदूर धनगरवाडा येथील सर्व्हे नंबर 221,222 मधील मधील वन विभागाचा शेरा कमी करून येथील शेतकऱ्यांना समसमान जमिनीची वाटप व्हावे. मिरुखेवाडी, कोकणेवाडी येथील तात्पुरत्या स्थलांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करून मार्गी लावू.
रणधीर नाईक म्हणाले :- प्रशासनाने या विभागातील असणाऱ्या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. वन प्राण्यांमुळे या विभागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले अशा परिस्थितीत आपण लोकांना मदत करणे आवश्यक आहे. मणदुर धनगर वाड्याच्या प्रश्नाबाबत महसूल विभागाने तात्काळ निर्णय घ्यावा. यावेळी चांदोली वन अधिकारी गणेश पाटोळे, मणदूरच्या सरपंच शोभा माने माजी सरपंच वसंत पाटील, शिराळा तालुक्याचे माजी उपसभापती नथुराम लोहार सावळा पाटील,हिंदुराव नांगरे, नाना पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी या विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते.