जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या दांडिया मध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

0

उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड हे विकसित परिसर असून अनेक मोठ मोठ्या इमारती व दाट नागरिकांचे वस्तीचे ठिकाण असून नागरिकांना नवरात्रौत्सवात देवीचे दर्शन घेता यावे.नवरात्रौत्सवात विविध उत्सव साहात साजरा करता यावेत, आपली संस्कृती परंपरा याची सर्वांना ओळख व्हावी आणि भारतीय परंपरेचे जतन व्हावे या दृष्टीकोनातून द्रोणागिरी शिवसेनेचे शहर शाखा प्रमुख मा.श्री. जगजीवन भोईर यांनी पुढाकार घेत जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ द्रोणागिरी नोड या मंडळाची स्थापना 2021 साली केली. यंदा नवरात्रौत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.  देवकृपा सर्कल, मॅजेस्टीक व्हीलाच्या समोर द्रोणागिरी नोड-उरण येथे 26 सप्टेंबर 2022 रोजी दुर्गामातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापण झाली असून येथे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. दररोज खेळण्यात येणाऱ्या गरबा (दांडियाला) जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असून या दांडियात महिलांचा खूप मोठा सहभाग असतो. लहान बालकासह, यूवक ,युवती, महिला येथे दांडिया खेळायला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

Post Settings

नवरात्रौत्सवात  विविध कार्यक्रम उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पदाधिकारी -माजी आमदार तथा  शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर,शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख तथा जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सल्लागार जगजीवन भोईर,युवासेना अधिकारी द्रोणागिरी शहर आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव नवरात्र अध्यक्ष करण पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहर संपर्क प्रमुख आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सल्लागार कल्पेश पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहर संघटक आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सल्लागार किसन शेठ म्हात्रे,व्यापारी असोसएशन द्रोणागिरी नोड अध्यक्ष आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सल्लागार रवींद्र पाटील,शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सल्लागार कु.प्रतीक पाटील,शिवसेना शहर सचिव  आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सह खजिनदार धनंजय शिंदे,फेरीवाला संघटना द्रोणागिरी नोड अध्यक्ष आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सेक्रेटरी सोमनाथ भोईर,व्यापारी असोसएशन उपाध्यक्ष आणि जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ सदस्य  कु.कुणाल घरत,जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ उपाध्यक्ष रुपेश पाटील,जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ खजिनदार स्वप्नील साळुंखे,शिवसेना द्रोणागिरी सेक्टर 30 शाखाप्रमुख कु.स्वराज तोटे,शिवसेना द्रोणागिरी सेक्टर 30 उप शाखा प्रमुख सनी पार्टे,शिवसेना द्रोणागिरी सेक्टर 48 शाखाप्रमुख अशोक पाटील,शिवसेना द्रोणागिरी सेक्टर 48 उप शाखाप्रमुख बाजीराव घोडके,युवासेना युवा अधिकारी सेक्टर 48 कु.हितेश घरत,शिवसेना सेक्टर 50 शाखाप्रमुख अंकुश चव्हाण,युवासेना युवा अधिकारी सेक्टर 50  सोपान दहिफळे,शिवसेना सेक्टर 51 शाखाप्रमुख संजय कापसे,शिवसेना सेक्टर 51 उप शाखाप्रमुख आनंद कोपे,शिवसेना सेक्टर 52 शाखाप्रमुख बापू गरुड,शिवसेना सेक्टर 53 शाखाप्रमुख अजय भोसले,द्रोणागिरी सेक्टर 48 महिला शाखाप्रमुख नंदाताई नोळे,द्रोणागिरी सेक्टर 48

उप शाखा प्रमुख शोभाताई वीर,महिला प्रमुख सुरेखाताई भोईर,युवासेना रायगड जिल्हा उपजिल्हा युवती अधिकारी कु.रविना ठाकूर,युवासेना उरण उप तालुका युवती कु.अंकिता घरत,युवासेना उरण उप तालुका युवती अधिकारी कु.बेबी ठाकूर, कु.कुणाल पाटील सदस्य जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ द्रोणागिरी नोड, ॲड.कैलास म्हात्रे सदस्य जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ द्रोणागिरी नोड,रमनिक म्हात्रे – संचालक तथा शिक्षक पतपेढी उरण आणि सदस्य जय अंबे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ द्रोणागिरी नोड तसेच कमेटी मेंबर-श्रीराम नोळे,प्रभाकर भोईर,विष्णू जाधव,सागर खांडेकर,कु.राजू रेवे,तायडे काका,चेतन घरत,दयानंद पडते,रुपेश पाटील (मॅपल),केतन नाईक,कैलास आगिने,सचिन भेंडे,प्रीतम म्हात्रे,शिवेंद्र म्हात्रे,संजय पाटील,श्रीमती ज्योती घरत,सुरेखा कोंढाळकर,रेश्मा जाधव,स्वप्नाली घरत,स्वाती चव्हाण,शोभा घेरडे यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here