जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही – नितेश राणे

0

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणेंनी ग्रामस्थांना दिलीय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन राणेंवर टीकास्र डागलंय. ग्रामपंचायतीत राणेंच्या विचारांचा सरपंच न निवडल्यास एका रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणेंनी दिलीय. सिंधुदुर्गातल्या नांदगावातला हा व्हिडीओ आहे. ही धमकी समजा किंवा इतर काही. अशा शब्दांत राणे ग्रामस्थांशी बोलतायत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. त्यामुळे मतदानावेळी हे लक्षात ठेवा, असंही नितेश राणेंनी म्हटलंय. भाजप आमदार नितेश राणेंनी ज्या गावात निधी न देण्याची धमकी दिली. त्या नांदगावात 11 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सत्तेसाठी एका पॅनलचे 6 नगरसेवक जिंकणं गरजेचं असतं. सध्या या ग्रामपंचायतीत 11 पैकी 10 सदस्य भाजपचे आहेत.

निधी न देण्याच्या इशाऱ्यासाठी नितेश राणेंनी देवगडमधल्या दोन गावांचा किस्साही सांगितला. देवगडमधल्या दोन गावांपैकी एका गावात विरोधकांचा सरपंच जिंकला. त्याचं पुढे काय झालं हे बोलत असताना समोर कॅमेरा असल्याचं राणेंच्या लक्षात आलं. आधी त्यांनी रेकॉर्ड करुन घे काही फरक पडत नसल्याचं म्हटलं. मात्र त्यानंतर कॅमेरा बंद करायला सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here