उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
मागील तीन वर्षापासून दिव्यांग सामाजिक संस्था उरण यांच्यातर्फे ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आणि याही वर्षी ३ डिसेंबर २०२४ रोजी मंगळवारी मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी उरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या दिवशी संपूर्ण उरण तालुक्यातील दिव्यांग बांधव एकत्र जमून दिव्यांग दिन साजरा करतात . उठ अपंगा जागा हो आपल्या हक्काचा तू धागा हो हा संदेश देणारे दिव्यांगांचे माऊली कैलासवाशी महादेव पाटील यांच्या पावलांवर पाऊल टाकत दिव्यांग सामाजिक संस्था उरण कार्य करत आहे. दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी या संस्थेच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सदर दिनाच्या दिवशी दिव्यांगाना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक दिव्यांग मित्र मनोहर शेठ भोईर माजी आमदार, प्रीतम म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष नेते, प्रमुख उपस्थिती साईनाथ पवार राज्य दिव्यांग सल्लागार मंडल दिव्यांग मंत्रालय मुंबई,मनीषा जाधव महाप्रबंधक प्रशासक जेएनपीटी, समीर वाठारकर गटविकास अधिकारी पंचायत समिती, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी महिला काँग्रेस, रवींद्र पाटील जेएनपीटी विश्वस्त , सुधाकर पाटील उरण सामाजिक संस्था, सीमाताई घरत सामाजिक कार्यकर्त्या, संतोष पवार उरण सामाजिक संस्था, भूषण पाटील माजी जे एन पी टी विश्वस्त, संदीप मात्रे लायन्स क्लब उरण, घनश्याम कडू उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आणि दिव्यांगाना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सीमाताई घरत यांनी दिव्यांगांना मिळणारी पेन्शन ही अतिशय कमी असल्याने ते वाढविण्याकरिता शासनाकडे मागणी केली,मनोहर शेठ भोईर यांच्याकडून दिव्यांग सामाजिक संस्थेला सहा लाखाची देणगी,याच संस्थेच्या पाठपुराने ओनजीसी कडून राशन किट किट,उडान एनजीओ मार्फत वॉटर करण्यात आले,
प्रीतम दादा म्हात्रे यांनी दिव्यांगाना उरण तालुक्यात दिव्यांगा करिता स्वयंरोजगार साठी सिडको मधून भूखंड मंजूर करून देण्याकरिता मदत करण्याची आश्वासन दिले.साईनाथ पवार यांनी दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजनांबद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरता उडान फाउंडेशन तर्फे दिव्यांगांचा ऑर्केस्ट्रा आणि मल्लखांब यांचे नयनरम्य असे सादरीकरण करत आलेल्या दिव्यांग बांधवांचे मनोरंजन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिव्यांग सामाजिक संस्थेने खूप मेहनत घेतली होती. आलेल्या मान्यवरांनी दिव्यांग सामाजिक संस्थेचे कौतुक केले . सदर संस्थेमधील संदेश राजगुरू, योगेश पाटील, समीर ठाकूर, महेंद्र म्हात्रे, महेश पाटील, राजेंद्र पाटील आदी संस्थेच्या शिलेदारांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली होती. त्याचबरोबर कोकण ज्ञानपीठ उरण कला आणि वाणिज्य शाखेतील एन एस एस च्या स्वयंसेवकांनीही खूप मेहनत घेतली. त्याकरता त्यांना संस्थेमार्फत कौतुकाचे थाप म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकंदरीत व्यासपीठावरील आलेल्या मान्यवरांचे आभार संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.