जासई विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

0

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई, ता. उरण जि.रायगड. या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण, डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती मोठ्या उत्साहात २२ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली.

       

विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या शुभहस्ते कर्मवीरांच्या पालखीचे पूजन केले. फुलांनी सजवीलेल्या  कर्मवीरांच्या पालखी मिरवणुकी सोबत विद्यालयाचे लेझीम पथक, ढोल ताशा, बँड पथक आणि सर्व विद्यार्थी कर्मवीरांच्या जयघोषाने संपूर्ण जासई गावातून पालखी मिरवणूक फिरविण्यात आली. यावेळी गावातील माता पालक,ग्रामस्थ आणि सुवासिनिंनी कर्मवीरांच्या पालखीचे पूजन करून आशीर्वाद घेतले. आकर्षक पोशाख आणि फेटे परिधान केलेल्या लेझीम पथकाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. संपूर्ण जासई गाव कर्मवीरांच्या जयघोषाने दुमदमून गेले होते.

           

 विद्यालयाचे प्राचार्य तथा रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार विद्यालयातील सर्व सेवक, विद्यार्थी यांनी हा पालखी मिरवणूक सोहळा यशस्वी केला. तसेच स्थानिक पोलिस प्रशासन यांनीही उत्तम सहकार्य केले.या पालखी मिरवणूक सोहळ्यासाठी विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील, व्हॉईस चेअरमन डी.आर.ठाकूर, नरेश घरत,रघुनाथ ठाकूर,सुभाष घरत, यशवंत घरत,रजनीताई घरत,रमेश पाटील,महाराष्ट्र राज्य रयत सेवक संघाचे समन्वयक  नुरा शेख,घरत टी.टी. आणि ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here