जासई विद्यालयात रायगड विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

0

उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )

रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात टिकून राहावा, त्याच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा व तो सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठी संस्था पातळीवर अनेक उपक्रम व स्पर्धांचे आयोजित केले जाते. याचाच एक भाग म्हणून कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई येथे रायगड विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

           

रायगड विभागाचे विभागीय अधिकारी आणि या विद्यालयाचे प्राचार्य कोंगेरे एम.के.यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील हे उपस्थित होते, तसेच विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन केले गेले.

         रयतच्या रायगड विभागातील २४ शाळांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते, दिवसभर या स्पर्धेच्या विविध फेऱ्या पार करून, या रायगड विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक गव्हाण शाखा, द्वितीय क्रमांक वावंजे शाखा, तृतीय क्रमांक जासई शाखा आणि उत्तेजनार्थ उलवे शाखा यांनी यश संपादन केले.

     

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विभागीय कार्यालयातील ओ.एस.गुजर सर, वैभव गावंड सर तसेच या स्पर्धेचे समन्वयक  डी.सी.पाटील, परीक्षक म्हात्रे टी.सी, सुहास नाईक,  भाळे एस.एन, गणेश भोईर  सर, नरेश भगत सर, वाजेकर एम.एस.या पूर्ण टीमने मेहनत घेतली. विद्यालयातील सर्व सेवकांनी या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी, शिक्षक व पाहुण्यांची चहापान नाश्ता व भोजनाची चोख व्यवस्था केले होती , विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांनी विद्यार्थ्यांना या जेवणासोबत गोड खाऊ दिला. या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य  नरेश घरत, महाराष्ट्र रयत सेवक संघाचे समन्वयक  नुरा शेख आदित्य घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घरत पी.जे.व प्रा. अतुल पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here